एकनाथ शिंदे यांच्यात पात्रता होती तर...? अजित पवारांची तुफान फटकेबाजी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एकनाथ शिंदे यांच्यात पात्रता होती तर...? अजित पवारांची तुफान फटकेबाजी

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्राच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांनी आजही चौफेर फटकेबाजी केली. आपल्या भाषणात अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोले लगावले. देवेंद्र फडणवीस तुम्ही भाषणात इतकं एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत होतात, मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रिमंडळात जे होते, त्या वेळेस फक्त रस्ते महाविकास महामंडळच त्यांना का दिलं. ते एवढं कर्तृत्वावान होते, चंद्रकांत पाटील तुम्हाला माहिती आहे असं सांगत त्यांनाही टोला लगावला.

महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी स्विकारली. कोणाला वाटलंही नव्हतं की असं काही घडेल, देवेंद्र फडणवीसांना आपल्या भाषणात उल्लेख केला की एक शिवसैनिक, पण का सारखं सांगावं लागतं. ते जर शिवसैनिक आहेत तर सतत तेच सांगण्याची वेळ का येते, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे वन, वित्त आणि नियोजन, महसूल, कृषी सहकार खाती होती. जर आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तुम्ही सांगताय तसे सर्वगुण संपन्न आणि पात्रता होती, तर त्यांना एक छोटसं रस्ता विकास महामंडळ का दिलं, त्यात त्यांचा जनतेशी संबंधच नव्हता फक्त हायवे करायचे, समृद्धी महामार्ग, टनेल करायचे इतकंच होत, तुम्हाला तेव्हा का नाही वाटलं की चला माझं एखादं खातं त्यांना देतो, याचाही विचार झाला पाहिजे असा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना अनेक वर्ष सभागृहात भाषण करता पाहिलं, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साह नव्हता. तुमचा जो जोश असायचा, मुख्यमंत्री असतानाही पाहिला आणि विरोधी पक्ष नेते असतानाही पाहिला. सर्व पीन ड्रॉप सायलेन्समध्ये तुमचं भाषण ऐकायचं, आज एकनाथ शिंदे यांची कारकिर्द कशी दैदिप्यमान आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांनी बंडखोर आमदारांनाही टोले लगावले. शिवसेना नेमकी काय आहे हे सांगतानाच बंडखोर करणारे पुन्हा कधीच निवडून येत नाहीत. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसैनिक नेहमीच ठाकरे कुटुंबाच्या पाठी राहिली आहे, असं सांगतानाच त्यांनी छगन भुजबळ, नारायण राणे यांची उदाहरणे देत बंडखोरांना घाबरवून सोडले. यावेळी त्यांनी काय डोंगार, काय झाडी, काय हाटील म्हणणाऱ्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही सुनावले. आपण एकाचवेळी निवडून आलो. पाच पाच लाख लोकांचं आपण नेतृत्व करतो, असं सांगत गोव्यात नाचणाऱ्या आमदारांनाही अजितदादांनी फटकारलं.

तुम्ही फार हुरळून जाऊ नका. ही मोठी लोकं कधी एकत्र येतील, यांचा काही नेम नाही. शिंदेसाहेब यांचं अभिनंदन करतो. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर हॉटेलात काही जणांनी नाच केला. नंतर टेबलावरच नाचायला लागले. सत्ता येते, जाते, आपण पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. याचं भान ठेवा, अशा शब्दात त्यांनी आमदारांना फटकारलं.

यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांचाही उल्लेख केला. गोव्यात आमदार नाचले. त्यामुळे प्रवक्ते म्हणून तुम्ही दिलगिरी व्यक्त केली. कारण तुमच्यावर राष्ट्रवादीचे संस्कार झालेलेत. अब्दुल सत्ताही शांत आहेत. त्यांनी एवढ्या काळात एकदाच भाष्य केलं. बिर्याणी खायला जातोय असं ते म्हणाले. पण नंतर त्यांची बिर्याणी दिसली नाही. मंत्रिमंडळ स्थिरस्थावर होत नाही, तोपर्यंत शांत बसायची सत्तार यांनी भूमिका घेतल्याचं दिसतंय, असा चिमटा त्यांनी काढला.

देवेंद्रजी, मी तुमचं भाषण बारकाईने ऐकत होतो. तुम्ही समर्थन करत होता. मग मागच्या टर्ममध्ये त्यांना फक्त रस्ते विकास महामंडळ हे खातेच का दिलं. ज्याचं वजन, भारदस्त असतं त्यांच्याकडे महत्वाची खाती असतात. जर आजचे शिंदे हे सर्वगुणसंपन्न होते तर त्यांना रस्ते विकास महामंडळ का दिले. जनतेशी संबंधित असताना कोणता विभाग का दिला नाही, याचाही विचार झाला पाहिजे.

मागील आठ दिवसात राज्यात बरंच काही घडलं. शिवसेनेचे त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास टाकून तुन्ही तिकडे गेला. ज्याज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर उदय सामंत, गुलाबराव पाटील एकही आमदार निवडून आला नाही. राणे यांच्यावेळीही शिवसेना फुटली. त्यावेळी किती आमदार निवडून आले, याचेही आत्मचिंतन करावे.

बऱ्याचशा गोष्टी आज न्यायप्रविष्ट आहेत. परंतु मग तोपर्यंत विश्वासदर्शक ठराव येण्याचं काही कारण होतं का. कोर्टाची लढाई कोर्टात चालेल. ठराव घाईत आणण्याची गरज नव्हती. बऱ्याच गोष्टी प्रलंबित ठेवण्याच्या गोष्टी राज्यपालांनी ठेवले. बारा आमदारांचा निर्णयही त्यांनी दिला नाही. आता राज्यपाल एकदम अॅक्शन मोडवर आले आहेत. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यपालांकडे जात होतो. आम्हाला तारीख देण्याची मागणी करत होतो. पण अध्यक्षांची निवड झाली नाही. आता लगेच ही निवड झाली. सर्व घटना चार दिवसांत खूप वेगात झाल्या. त्यामुळे जनतेच्या मनात शंका उपस्थित होतात.

गेल्या आठ दिवस बरंच काही बघितलं. खरं तर अनेकांना सुरतमध्ये, तिथून गुवाहाटी, तिथून गोवा. आजपर्यंतच्या हयातीत इतक्या दहा दिवसांत आमदारांना फिरायला मिळालं नसेल. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओके, असंही झालं. शहाजीबापू, आपण एकत्र काम केलं आहे. यातून लगेच गोंधळून जायचं कारण नाही. मोठी लोकं कधी एकत्र येतील सांगता येणार नाही.