अजित पवारांच्या निवडीनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून समाधान व्यक्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अजित पवारांच्या निवडीनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून समाधान व्यक्त

मुंबई, (प्रबोधन न्यूज) – विधान सभेतील विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची महाविकास आघाडीकडून एकमुखाने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर सभागृहात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तसेच त्यांच्या निवडीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जे गुण एका चांगल्या राजकारण्यामध्ये हवे असतात ते अजित पवारांमध्ये आहेत. त्यांनी सुट्टीच्या वेळेलाही मला भेटायला बोलावलं. तेव्हा मी लेट झालो. पण ते वेळेत पोहोचले होते. ते टायमिंग कधीच चुकवत नाहीत. हे सभागृह यशस्वीपणे चालवण्यात मलाही त्यांचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो.

शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले की, अजित पवारांचे गुणविशेष, कार्यक्षमता, निर्णयक्षमता याबाबत सर्वांना कौतुक आहे. त्यांना स्वच्छताही आवडते. वक्तशीरपणा हा त्यांच्यातला एक मोठा गुण आहे. कोरोनाच्या काळातही अजित पवारांनी सतत मंत्रालयातून लोकांची कामं केली. हे सर्वांना मान्य करावं लागेल. अंतुले साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी वाढवलेले अधिकार, आमदार हा सक्षम राहिला पाहिजे. अजित पवारांनही आमदारांचे अधिकार वाढवण्याचे काम केले. मोदींच्या कार्यक्रमात तुम्हा बोलायला दिलं नाही. ते तुम्ही शांतपणे घेतलं. त्यामुळे मला भिती वाटू लागली आहे. अजितदादा विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही कणखर भूमिका बजवा, तुमचं अभिनंदन.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, अजित पवारांना अनेक वर्षांपासून पाहतोय. ते सर्वांना सांभाळून घेतात. अत्यंत स्पष्टवक्ते ते आहेत. अजित पवारांची मैत्री ही वेगळी आणि विरोधी पक्षनेते असल्यावर सरकारवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही त्यांची आहे, याचा उपयोग ते चांगल्या पद्धतीने करतील, याची खात्री मला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची खुर्ची जनतेला न्याय देण्यासाठी ते नक्की वापरतील हा मला विश्वास आहे. मला खात्री आहेत या सभागृहात ज्या गोष्टीत शासनाकडून त्रुटी राहतील. त्यावर दादा नक्की बोट ठेवतील. अजित पवारांना अनेक खात्यांचा मोठा अनुभव आहे. इतर सर्व खात्याचा मंत्री होणं वेगळं आणि अर्थमंत्री होणं वेगळं. त्याचाही अनुभव हा अजित पवारांना आहे. सरकार जे चांगलं करेल त्याला अजित पवारांचं सहकार्य नक्की मिळेल. संकटाच्या काळात अजित पवार धावून जातील.

एकनाथ शिंदे यांचं सरकार चांगलं काम करेल यात दुमत नाही. तुमच्या चुकांवर बोट ठेवायचं हेचं विरोधी पक्षनेत्याचं काम असतं. मंत्रिमंडळात काम करणाऱ्यांनाही अजित पवार चांगलं सहकार्य करतील. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेता म्हणून निवडलं आहे. त्यांना शुभेच्छा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारसाहेब हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या आईचा उल्लेख करतात. त्याच माऊलीचे संस्कार अजित पवारांनाही मिळाले आहेत. पुणे मध्यवर्ती निवडणुकीपासून त्यांनी त्यांच्या कामाला सुरूवात केली. बारामतीचे आमदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केलं. त्या कामाचं कौतुक अनेकांनी केलं आहे. अधिकाऱ्यांवर अजित पवारांचा चांगला वचक आहे. अजित पवारांसोबतची बैठक ही निर्णायक असते. विरोधी पक्षनेते म्हणून तुमच्या सूचना आमलात आणू.

अजित पवारांची प्रेमाची दादागिरी चालते. अजित पवारांनी दिलेला शब्द हा मोडला जात नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे स्थिर आहेत. मात्र अजित पवार हे वक्तशीर आहेत. मागच्या काळात मंत्रालय बंद राहिलं असतं. मात्र अजित पवारांमुळे उघडायला लागायचं. काम होणार असेल, नसेल तर ते तोंडावर सांगतात. त्यांना सर्व प्रकारची चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. त्यांचा आणि माझा जन्मदिवस एकच आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते एकदा अडचणीत आले. मात्र आता ते विचार करून बोलतात.