विविध उपक्रमांनी निगडीत सीए दिन साजरा 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

विविध उपक्रमांनी निगडीत सीए दिन साजरा 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - निगडी येथील आयसीएआय भवन येथे (इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौटंटस् ऑफ इंडिया)चा ७४ वा स्थापना दिवस पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने साजरा करण्यात आला. पुणे येथील प्रमुख पाहुणे मुख्य आयकर आयुक्त  एस के सिंग यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर त्यांच्या हस्ते 40 वर्षे प्रॅक्टिस झालेल्या सीए डॉ. अशोककुमार पगारिया यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व शाखेचे उपाध्यक्ष सीए सचिन  बन्सल, सचिव सीए पंकज पटणी, खजिनदार सीए सारिका चोरडिया, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए वैभव मोदी, कमिटी सदस्य सीए सचिन ढेरंगे यांच्या हस्ते ज्यांच्या परिवारात एका पेक्षा अधिक सीए आहेत अशा परिवारातील सर्व सीएंचा व ज्यांना सीएची प्रॅक्टिसची २५ वर्षे पूर्ण झाली आहेत अशा एकूण सुमारे १५० सीएंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्थापना दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सफाई मोहीम आणि आर्थिक आणि करविषयक साक्षरता कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले.

या वेळी सुमारे १५० सीए, १०० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम विभागीय मंडळाचे माजी सदस्य सीए डॉ. अशोककुमार पगारिया, शाखेचे माजी अध्यक्ष सीए बबन डांगळे, सीए संतोष संचेती, सीए सिमरन  लीलवानी, सीए सुहास गार्डी, तसेच सीए सत्यनारायण चोभे, सीए किशोर गुजर, सीए कुंतीलाल शिंगी, सीए प्रवीण पोकर्णा, सीए जे. आर्. मुल्ला, सीए नंदकुमार तोष्णीवाल आदी उपस्थित होते. सीए भूषण तोश्नीवाल यांनी सरस्वती गीत म्हणून शुभारंभ केला. उपाध्यक्ष सीए सचिन बन्सल यांनी प्रास्ताविक केले व सीए पंकज पटणी यांनी आभार मानले.