अदानी उद्योग समूहाची चौकशी करा - डॉ. कैलास कदम

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अदानी उद्योग समूहाची चौकशी करा - डॉ. कैलास कदम

एलआयसी आणि एसबीआय मधील सामान्यांच्या पैशांची हमी द्या

पिंपरी - अदानी यांनी शेअर बाजारात गुंतवणूकीचे कायदे पायदळी तुडवून हजारो कोटींचा आर्थिक घोटाळा केला आहे. हे हिंडेनबर्ग कंपनीने उघडकीस आणले आहे. अदानी यांच्या कंपन्यांमध्ये एलआयसी आणि एसबीआय च्या व्यवस्थापनाने हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे एलआयसी आणि एसबीआय मधील हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा असून या पैशाबाबत केंद्र सरकारने हमी द्यावी. अदानी उद्योग समूहाने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या आर्थिक घोटाळ्याची चौकशी केंद्र सरकारने समिती नेमून करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पुणे मुंबई महामार्गावरील एसबीआयच्या शाखेसमोर आणि आकुर्डी प्राधिकरणातील एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर ॲन्थोनी, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायणन, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, शिक्षण मंडळ  माजी सभापती अभिमन्यू दहितुले, डाॅ. मनिषा गरूड, प्रियंका कदम, भारती घाग, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, सुनिता जाधव, भाऊसाहेब मुगुटमल, निखिल भोईर, मिलिंद फडतरे, प्रा. किरण खाजेकर, रवि नांगरे, भास्कर नारखडे, बाबासाहेब बनसोडे, गौतम ओव्हाळ, हरिष डोळस, दिपक भंडारी, आण्णा कसबे, सतीश भोसले, रवि कांबळे, गणेश नांगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.