कावेरीनगर सब-वे-मधून चारचाकी वाहनांना बंदी सायंकाळी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करा - माजी नगरसवेक गायकवाड

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - थेरगावच्या सोळा नंबर बस स्टॉप येथील कावेरीनगर सब-वे मधून चारचाकी वाहनांना ये-जा करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, त्यामुळे वाहतूक समस्या कायमची सुटेल, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केली आहे. त्यावर वाहतुकीला सायंकाळी निर्बंध घालण्यात आले आहेत.

सकाळी व सायंकाळी चारचाकी वाहने सब-वे मधून विरुद्ध दिशेने ये-जा करतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नागरिक व पादचाऱ्यांना येथून ये-जा करताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी होऊन अपघातही होत आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांना बंदी घालण्याची मागणी गायकवाड यांनी केली होती. त्यामुळे पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी बुधवारपासून (दि. 28) येथील वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले होते.

कावेरीनगर सबवेमधून मोटार सायकल, रिक्षा वगळता अन्य सर्व वाहनांना बंदी केली आहे. कावेरीनगर सबवे कडून काळेवाडी फाट्याकडे जाणारी वाहने गुजरनगर अंडरपास येथून इच्छितस्थळी जातील. 16 नंबरकडून वेणुनगर, कावेरी नगरकडे जाणारी वाहने काळेवाडी फाटा येथून यू टर्न घेऊन इच्छित स्थळी जातील. या प्रायोगिक बदलाबरोबर लेखी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करा, अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.