अमरावतीमधील व्यापाऱ्याचा खून नुपूर शर्मांचे समर्थन केल्यानेच
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अमरावती, (प्रबोधन न्यूज) - अमरावती या ठिकाणी एका व्यापाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण खून झाला. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाली असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांकडून करण्यात आला आहे. कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून तशी माहिती देण्यात आली आहे.
राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी म्हणाले की, “उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे. एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.”
महाराष्ट्रातल्या अमरावती या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाणे भागात येणाऱ्या चर्चच्या मागे २१ जून रोजी अमित मेडिकल चालवणारे व्यापारी उमेश कोल्हे हे आपल्या मुलासह आणि सुनेसह दुकान बंद करून परतत होते. त्यावेळी तीन बाईकस्वारांनी त्यांच्यावर वार केले आणि त्यांची हत्या केली.
उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नव्हता. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू होता, आज पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
“नुपूर शर्मांच्या पोस्ट ज्यांनी लाईक केल्या, कमेंट केल्या, फॉरवर्ड केल्या त्या सर्वांना धमक्या आल्या आहेत. माफी मागा म्हणून या धमक्या आल्या आहेत. उमेश कोल्हे यांचे मी जे स्क्रिनशॉट पाहिले त्यातही असाच प्रकार आढळून आला. त्यामुळे या खूनाशी त्या गोष्टीचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असं मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केलं होतं.
“याबाबत नागरिक अमरावती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू शकतात. पोलीस सतर्क आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल,” असंही नमूद करण्यात आलं. या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे का याचाही तपास करण्यात येत आहे.