जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी – जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या भंडारा डोंगर ट्रस्टच्या ऐतिहासिक मंदिर उभारणी कामे नागरिकांनी तन-मन-धनाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी केले आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे होणाऱ्या हरी किर्तन सप्ताहाची सांगता ह.भ.प.महादेव महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सालाबाद प्रमाणे याही वर्षीही या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मावळ पंचक्रोशी व महाराष्ट्रातील विविध भागातून वारकरी कीर्तनकार साहित्यिक राजकीय नेते उपस्थित होते. एवढेच नव्हे तर ब्रिटनमधून देखील काही नागरिक उपस्थित होते. त्यांचाही ट्रस्टच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या ट्रस्टच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांची भव्य दिव्य सुंदर ऐतिहासिक मंदिराच्या उभारणीचे काम श्री बाळासाहेब काशीद यांच्या नेतृत्वाखाली सर्व ट्रस्टी आहोरात्र तन-मन धनाने योगदान देऊन अहोरात्र कष्ट घेत आहेत.
या ऐतिहासिक मंदिरासाठी दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होणार असून निम्मे काम झाले आहे. आणखी निम्मे काम होणे बाकी आहे. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होणार आहे. या कामासाठी महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील नागरिकांनी यथाशक्ती जगद्गुरु संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टला या मंदिर उभारणी कामे सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मारुती भापकर यांनी केले आहे.