पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष भाजपापासून वेगळी चूल मांडणार ? 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष भाजपापासून वेगळी चूल मांडणार ? 
पुणे -
राष्ट्रीय समाज पक्षाची पुण्यात कोणाबरोबर युती होणार नाही, पुणे महापालिकेसाठी 166 जागा रासप लढणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे. त्यांनी रासपच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही घेतला आहे. पुण्यात रासपने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने भाजपला पहिला धक्का बसला आहे. त्यामुळे राजसप भाजपपासून कायमची फारकत घेणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. 
पुणे, मुंबईसारख्या अनेक मोठ्या महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुण्याच्या महापालिकेची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत, तर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटलांची प्रतिष्ठादेखील पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच रासप भाजपपासून फारकत घेणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

पुणे पुन्हा काबीज करण्यासाठी अजित पवार पूर्ण ताकद लावताना दिसून येत आहेत. तर पुण्यातली सत्ता राखण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असे बडे नेते मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यात जाऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिसून येत आहे. शिवसेनेकडून पुणे जिंकण्याची जबाबदारी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात चौरंगी लढत होताना दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेची सत्ता कोण काबीज करणार हे निवडणुकीनंतरच कळेल, रासपच्या स्वबळावर लढण्याचा थोडाफार फटका तरी भाजपला बसेल एवढं मात्र नक्की.