प्राजक्ता माळी योग दिनी १०८ सूर्य नमस्कार घालणार; पण ठेवली अट (व्हिडिओ)
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, (प्रबोधन न्यूज) – प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ देखील ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसते. आता देखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चक्क एकाच वेळी १०८ सूर्यनमस्कार करताना ती दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
योगा आणि प्राणायम हा प्राजक्ताचा आवडीचा विषय आहे. व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत ती याकडे विशेष लक्ष देते. तिच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सूर्यनमस्कारचा देखील समावेश असतो. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते पाहायला मिळतं. सूर्यनमस्कार करत असताना प्राजक्ता कुठेही दमली नसल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करत असताना प्राजक्ताने म्हटलं आहे की, “जागतिक योग दिनाच्यानिमित्ताने मी आज १०८ सूर्यनमस्कार केले. योग दिन हा २१ जूनला असतो. कदाचित या दिवशी मी पुन्हा सूर्यनमस्कार करेन. पण तुम्हीपण माझ्याबरोबर करणार असाल तर… काय म्हणता करणार का? तुम्हाला जमेल तितके करा.”
https://www.instagram.com/tv/Ce7o7yIgne0/?utm_source=ig_web_copy_link