पालखी मार्गावर ड्रोनने शूटिंग करण्यास मनाई
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.
दिनांक १७/०६/२०२२ ते दिनांक २२/०६/२०२२ रोजी पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचा आळंदी व देहुगाव येथून पादुका प्रस्थान सोहळा व आषाढी वारी सालाबाद प्रमाणे संपन्न होणार असल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुतालयाच्या वतीने पालखी मार्गावरील व आजूबाजूच्या परिसरात ड्रोन व ड्रोन सदृश्य कॅमेराने छायाचित्रण (शूटींग) करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे कालावधीत आळंदी शहरात व देहुगाव येथे लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकच ठिकाणी एकवटलेले असतात. काही लोक ड्रोनव्दारे किंवा ड्रोन सदृश्य कॅमेराव्दारे छायाचित्रण (शूटींग) करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याप्रमाणे आषाढी वारीकरीता येणारे भाविक हे मुख्यतः ग्रामीण भागातील असून त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नाही. त्यामुळे अचानक ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले तर भाविकांमध्ये अफवा पसरून गडबड गोंधळ उडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर तसेच देहगाव येथील श्री. विठ्ठल मंदिर, परिसर व संपूर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दिनांक १७/०६/२०२२ ते दिनांक २२/०६/२०२२ रोजी पर्यंत ड्रोनव्दारे किंवा ड्रोन सदृश्य कॅमेराव्दारे पूर्व परवानगीशिवाय छायाचित्रण (शूटींग) करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पालखी मार्गावर फूल, फळ, खेळणी विक्रेते हातगाड्या लावून जमिनीवर बसून त्यांची विक्री करीत असतात. रस्त्याचे दोन्ही बाजूला त्यांच्या बसण्यामुळे रस्त्याची रुंदी लहान होऊन पालखी प्रस्थान सोहळ्याच्या वेळी त्याचा परिणाम जाणवतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता असते. तसेच गर्दीचा फायदा घेऊन गुन्हेगार प्रवृतीचे लोक आपला हेतू साद्य करतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
त्या अनुषंगाने आळंदी येथील संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज मंदिर व परिसर तसेच देहुगाव येथील श्री. विठ्ठल मंदिर, व तसेच हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गावर दिनांक १७/०६/२०२२ ते दिनांक २३/०६/२०२२ रोजी पर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला फुल, फळ, खेळणी विक्रेते हातगाडीवाले यांना बसण्यापासून प्रतिबंध करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने कळविण्यात आले आहे.