"कुछ लोग डरते है और उस डर को छुपा ने के लिए फोटो मे बहाना ढूँढते है.."
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 24 मे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीचं कारण सांगितले होते. आपल्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मनसे नेते सचिन मोरे यांनी शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचे एका कार्यक्रातील फोटो शेअर करताना ट्विट करत "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है." असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
या आरोपाला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी उत्तर दिलं आहे. "कुछ लोग डरते है और उस डर को छुपा ने के लिए फोटो मे बहाना ढूँढते है..." घाबरून अयोध्या दौरा रद्द केला, स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केले. "लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है." असं ट्विट करत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे.
मनसेने शेअर केलेले हे फोटो २०१८ मधील मावळ येथील कुस्ती स्पर्धेतील आहेत. मावळमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेतील खासदार सुप्रिया सुळे यांनी ते त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. तेच फोटो मनसेने ट्विट केले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी २०१८ मध्ये हे फोटो पोस्ट करताना म्हटलं होतं की, भारतीय कुस्ती संघ आणि नगरसेवक मयूर कलाटे व राष्ट्रवादीचे पुणे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मातीतील वरिष्ठ गटाच्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेस उपस्थित होते. यावेळी हरियाणाच्या विशाल कुमार यांनी चांदीची गदा मिळवत स्पर्धा जिंकली, असंल्याचं त्यांनी म्हटलं होतं.