अंसार गझवत उल हिंद या अतिरेकी संघटनेचे जाळे दापोडीत पोहोचले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अंसार गझवत उल हिंद या अतिरेकी संघटनेचे जाळे दापोडीत पोहोचले

पिंपरी-चिंचवड, दि. 24 मे - पुणे दहशतवादी विरोधी पथकाने दापोडी परिसरातून आज एका तरुणाला अटक केली. जुनेद मोहम्मद (वय 28) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात होता. राज्यात घातपाती कृत्यांसाठी काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून या तरुणाला पैसे पुरवण्यात आले, असा आरोप त्याच्यावर आहे.

पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या 28 वर्षे वयाच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या दापोडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी जुनेद हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे. मागील दीड वर्षांपासून तो दापोडी परिसरातील एका मदरशाजवळ भाड्याच्या घरात राहतो. या परिसरातील काही स्थानिक तरुणांच्या तो संपर्कात होता. जम्मूतील उमर आणि आफताब शहा या दोन व्यक्तींच्या तो संपर्कात होता. या दोघांनी त्याच्या बँक खात्यावर काही पैसे पाठवण्याची देखील निष्पन्न झाले आहे. अतिरेकी कारवाया करण्यासाठी ते पैसे पाठवल्याचे समोर आले आहे.

अतिरेकी कारवायांसाठी तरुण मुलांची भरती करणे आणि त्यांना दारूगोळा आणि शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी त्याला फंडिंग केले जात असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे दापोडीतील ज्या परिसरात तो राहत होता तेथील काही स्थानिक तरुणांच्या संपर्कात होता. स्थानिक तरुणांना अतिरेकी कारवायात सहभागी करून घेण्यासाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु त्यापूर्वीच दहशतवाद विरोधी पथकाने त्याला अटक केली.

पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, अंसार गझवत उल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता. आरोपीला पुणे न्यायालयात दुपारी हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार आहे. तरुणाला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे आता तपासून पाहिले जाईल. काही दिवसांपासून एटीएस आरोपीच्या मागावर होते. अखेर त्याच्या आज मुसक्या आवळण्यात आल्या.

जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाने ही अंसार  गझवत उल हिंद या नावाने एक वेगळी संघटना तयार केली आहे, याचा अर्थ हिंदीत भारताचा विनाश असा होतो. झाकीर मुसा हा या संघटनेचा चीफ होता. त्याचा भारतीय लष्कराने खात्मा केला. त्याच्या हत्येनंतर अल-कायदाच्या भारतीय उपमहाद्वीपच्या प्रवक्त्याने एक ऑडिओ स्टेटमेंट जारी केले, त्यात अब्दुल हमीद लल्हारी याची संघटनेच्या प्रमुखपदी घोषणा करण्यात आली होती. काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात या संघटनेचा हात आहे.