बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या
बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या

बीड, (प्रबोधन न्यूज) - बीड भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियानी यांनी आज सकाळी गोळी झाडून आत्महत्या केलीय. त्यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. बियानी यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजले नसून, या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

भगीरथ बियाणी यांनी सकाळी गोळी झाडून घेत स्वतःला संपवले. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

बियाणी यांच्या आत्महत्येची बातमी समजताच खासदार प्रीतम मुंडे यांनी तत्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही रुग्णालयात पोहचले. या अचानक घडलेल्या घटनेने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. या मागे कौटुंबिक कारण की राजकीय अशी चर्चाही रंगली आहे.

कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. बियाणी यांचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे फोटो आणि विविध कार्यक्रमामधील फोटो फेसबुक, ट्विटर आणि सोशल मीडियावर शेअर केले. व्हॉटस्अप ग्रुपवरही बियाणी यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.