अयोध्या दौऱ्या अगोदरच मनसेत आपापसात राडा
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 19 मे – महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला रामाचे दर्शन घेण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसोबत जाणार आहेत. त्याच्या नियोजनासाठी पुण्यात मनसे कार्यालयात बुधवारी रात्री बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीतच वादावादी होऊन कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं समजतंय. त्यामुळं मनसेत सारं काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळाले. या पूर्वी मनसेचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनीही मनसेच्या शहरातील इतर नेत्यांवर टीका केली होती. वसंत मोरे यांनी मी शहर कार्यालयात कधी जात नसल्याचेही सांगितले होते. मनसेच्या फायर ब्रांड नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही अंतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
बैठकांना बोलावत नसल्याच्या रागातून शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर एकमेकांना भिडले. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा वाद झाला आहे.
पुणे मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते भिडल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. सभेबाबतची बैठक होती. यावेळी शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष आणि मनसैनिकामध्ये झटापट पाहायला मिळाली. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांचा मनसे कार्यालयात राडा झाला. रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असून कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही, याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.
पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यासमोर हा वाद उफाळून आला. अयोध्ये दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हे भांडण झाल्याने मनसेत आलबेल चालल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अंतर्गवादामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.