पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेसह सहा जणांना ६ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरेसह सहा जणांना ६ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी

पुणे, (प्रबोधन न्यूज) – शिंदे गटाचे उदय सामंत यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ आरोपींना पोलिसानी अटक करून आज न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने या सर्व आरोपींना ६ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांची काल रात्री सभा कात्रज चौकात झाली. यावेळी याच चौकातून शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत हे चार चाकी वाहनांतून जात होते. त्यावेळी काही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत गाडीची काच फोडली. या प्रकरणी रात्री उशीरा १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काही तासात पोलिसांनी हिंगोली संपर्क प्रमुख बबन थोरात, शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, संभाजी थोरवे, राजेश पळसकर, सुरज लोखंडे, चंदन साळुंखे या आरोपींना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. सहा आरोपींना आज १२ च्या सुमारास न्यायाधीश तापडिया यांच्या समोर हजर करण्यात आले.

उदय सामंत यांच्यावर हल्ला झाल्या प्रकरणी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ जणांना कोर्टात हजर करण्यात आले. हा हल्ला म्हणजे कट आहे का? किंवा कोणाच्या सांगण्यावरून हल्ला केला आहे याचा तपास करण्यासाठी सरकारी वकिलांनी ८ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी वकिलांनी मांडलेले मुद्दे हे विजयसिंह ठोंबरे या आरोपींच्या वकिलानी खोडून काढले. ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी दिसत नाही, अटक करण्यात आलेल्या या सहा जणांवर केवळ खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असा युक्तिवाद आरोपिंच्या वकिलांकडून करण्यात आला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश तापडिया यांनी ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.