राज ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरल्या साध्वी कांचनगिरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
लखनौ, दि. 19 मे – महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन कार्यकर्त्यांसह घेणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले आहे. जो पर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी त्यांनी संतांचा मेळावाही घेतला. या सभेत राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशच काय बिहार, छत्तीसगढ येथेही प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज ठाकरे अयोध्येचा दौर करणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ साध्वी कांचनगिरी मैदानात उतरल्या आहेत. राज ठाकरे यांना फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंग यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे.
कांचनगिरी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून बृजभूषण सिंह यांना आवर घालण्याची मागणी केली आहे. कांचनगिरी यांनी थेट बृजभूषण सिंह यांना खुले आव्हान दिले आहे. राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून कोण रोखतं ते मी बघतेच, असे म्हणत त्यांनी बृजभूषण सिंहांना चॅलेंज दिले आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कांचनगिरी यांनी जोरदार निशाणा साधला. संतांचा सन्मान न करणारे, राष्ट्राचा काय सन्मान करणार? असा सवाल कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावर उपस्थित केला आहे. तर राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गुणगान गायले आहे.
राज ठाकरेंची बाजू घेत साध्वी कांचनगिरी यांनी बृजभूषण सिंह यांना ललकारले आहे. त्या म्हणाल्या, राज साहेबांचे सगळ्यात आधी मी अभिनंदन करते. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसून येते. ते हिंदूंचा बुलंद आवाज आहेत. मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन करते. बृजभूषण यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, त्यांनी दुसऱ्याकडे बोट दाखवून नये. त्यांना संतांच्या रोषाचा सामना करावा लागेल.
त्या पुढे म्हणाल्या की, याबाबत मी स्वतः मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांना समजवा, त्यांना आवर घाला. त्यांना संतांचा सामना करावा लागेल. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बृजभूषण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत. बृजभूषण यांना रोखावं. जर तुम्हाला जराजरी दया असती, तर तुम्ही एखादा कारखाना उभा केला असता. येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असता. मी चॅलेंज करते. राज ठाकरे अयोध्येत येणारच. मी बघतेच बृजभूषण किती विरोध करतात. यांची काय हिंमत आहे. मी यांना बघून घेईल. मी एकटी त्यांना पुरून उरेन. राज ठाकरेंचा संताप्रती आदर आणि प्रेम दिसून येतो. माझ्याकडेही बृजभूषण यांच्याविरोधात अनेक पुरावे आहेत. बघुया कुणात किती दम आहे. राज ठाकरेंना कोण रोखतं ते मी बघतेच.
दौरा राज ठाकरे यांचा पण त्याचे परिणाम भाजपमध्येच पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्यामुळे भाजपमध्ये दोन गट तयार झाले आहेत. एका गटाचा विरोध आहे तर दुसऱ्या गटाचा पाठिंबा आहे. दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, रामाच्या दर्शनाला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. राम सर्वांचा आहे. जर राज ठाकरेंमध्ये सकारात्मक बदल होत असतील तर त्याचे स्वागत करायला हवे असे एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात दौरा होईल त्या वेळी अयोध्येत काय परिस्थिती निर्माण होईल हे ते रामच जाणो.