महापालिकेच्या अधिकाऱ्याने अपशब्द वापरल्याने दुकानदारांनी पुकारला बंद
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, दि. 18 मे – पिंपरीतील कॅम्प येथील बाजारपेठेतील दुकानदारांनी अचानक बंद पुकारला आहे. त्यामुळे नेहमी गजबजणारे मार्केटमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज महापालिकेतील अधिकाऱ्यांनी येथील जे दुकानदार कॅरी बॅग वापरतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. काही दुकानदारांनी कुरकुरत दंडाची रक्कम भरली.
मात्र एके ठिकाणी दुकानदाराने दंड भरण्याची क्षमता नसल्याचे सांगताच अधिकाऱ्याने दंड भरता येत नसेल तर विष प्या असे सुनावल्याचे समजतंय. त्यावरून दुकानदार व महापालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी बाजारपेठेत पसरली, आणि दुकानदारांमध्ये संतापाची लाट पसरली. सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पिंपरीमधील कॅम्प बाजार हा पिंपरी व पुण्यातही प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणावर मोबाईल व कपड्यांची दुकाने आहेत. वाजवी भावात वस्तू मिळते असा नागरिकांचा समज असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
गेल्या एक तासाहून मार्केट बंद असून, काही नेते मंडळी व अधिकारी हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांना दुकाने चालू करण्याची विनंती करीत आहेत.