बाळासाहेबांनी मराठी माणसातील सिंह जागा केला - प्रा बानुगडे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बाळासाहेबांनी मराठी माणसातील सिंह जागा केला - प्रा बानुगडे

पिंपरी - मुंबई ही महाराष्ट्राचा प्राण आहे. मराठी माणसांच्या मुंबईत मराठी माणसांचे अस्तित्व नगण्य होते. अशा परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करून मराठी माणसांतील सिंह जागा केला, असे उद्गार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी काढले. निगडी येथील जयहिंद मित्र मंडळ ट्रस्ट आणि जय बजरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयहिंद लोकजागर व्याख्यानमालेत "हिंदुहृदयसम्राट कै बाळासाहेब ठाकरे" या विषयावर ते बोलत होते.

यावेळी उपनेते शिवाजीराव आढळराव, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे, उद्योजक लक्ष्मण काचोळे, जयहिंद मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजेश फलके, कार्याध्यक्ष दयाराम क्षीरसागर आदी उपस्थित होते.

प्रा बानुगडे पुढे म्हणाले की, शिवसेनेला संपवू पाहणारे स्वतः संपले मात्र शिवसेना आजही ताठ मानेने उभी आहे. ही बाळासाहेबांच्या कर्तृत्वाची किमया आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब नेहमी राष्ट्रहिताला प्राधान्य देत म्हणायचे की, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले यासाठी महाराष्ट्र जगवावे लागेल. या विचारांची अमंलबजावणी करीत आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. त्यांनी हिंदुत्वाचा जागर करीत राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेची धगधगती मशाल उभी केली.

मराठी माणसास पोटास लावणे या उक्तीप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी कंपन्या, एअर इंडिया, विमा, बॅंकांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या. बाळासाहेबांनी ही किमया तंत्रावर किंवा मंत्रावर नव्हे तर आपल्या स्वरयंत्राच्या माध्यमातून केली.

देशाला शिस्त लागावी या हेतूने कै बाळासाहेब ठाकरेंनी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुकारलेल्या आणीबाणीला पाठींबा दिला. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याची,  जातपात न बघता उमेदवारांना तिकिटे देवून असंख्य पदावर बसवून समाजसेवा करून घेतले. हे केवळ शिवसेनाच करू शकते.

माजी खासदार आढळराव म्हणाले की, माझ्यासारख्या व्यावसायिक माणसाला शिवसेना प्रमुखांनी पक्षात घेतले आणि अवघ्या ४० दिवसांत खासदार केले. मी  निवडून येईन असे अजिबात वाटत नव्हते. पण बाळासाहेबांनी दिल्लीला जाण्यासाठी बॅग भरायला सांगितली. हा प्रचंड आत्मविश्वास होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश फलके यांनी केले. सूत्रसंचालन मनोज बेताळे तर दयाराम क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय भोसले, शांताराम क्षीरसागर, राजीव मेनन, नितीन वाटकर, राहूल भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले.