गट 'ड' ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार - राजेश टोपेंची मोठी घोषणा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गट 'ड' ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेणार - राजेश टोपेंची मोठी घोषणा
मुंबई -
आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा पात्रता परीक्षा घेऊ किंवा नव्या परीक्षा पद्धतीनं परीक्षा घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, अशी मोठी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. कोणत्याही चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची निवड केली जाणार नाही, असंही राजेश टोपे म्हणाले. 
कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खाल्ल्याचे समोर आले आहे.  ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

गट क साठी 15 लाख रुपये आणि गट क साठी 8 लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे. अमरावतीमध्ये 200 विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला.

दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे.चौकशीत याची पाळंमुळं खोदून काढूया, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करु,असं राजेश टोपे म्हणाले. आरोग्य विभागानं स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असं राजेश टोपे म्हणाले.

न्यासाला काम का दिलं, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळलं जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले.

निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करु, असंही राजेश टोपे म्हणाले. न्यासा कंपनी हायकोर्टात गेली होती. त्यानंतर न्यासाचं सिलेक्शन करण्यात आलं. आरोग्य विभागानं पाच लोकांना कळवलं. पाच कंपन्यांकडून डेमो घेतला. आरोग्य आय़ुक्त, सार्वजनिक आरोग्य सचिवांनी परीक्षा घेतली. ऍप्टेकला 71, जीए सॉफ्टवेअर 83 , मेटा आयटेकला 78 आणि न्यासाला 90 ला गुण होते.