बृजभूषण सिंह यांची शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर स्तुतिसुमने

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

 बृजभूषण सिंह यांची शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर स्तुतिसुमने

लखनौ, दि. 13 मे - राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी आपला विरोध महाराष्ट्राला वा मराठी माणसाला नसून फक्त राज ठाकरे यांनाच विरोध आहे असे सांगताना त्यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात तुलना केली आहे. त्यांनी मुक्त कंठाने शरद पवार व सुप्रिया सुळे यांची प्रशंसा केली आहे.

बृजभूषण म्हणाले की, शरद पवार मनाने मोठी व्यक्ती आहे. जर हे प्रकरण शरद पवारांविरोधात असतं तर आतापर्यंत त्यांनी पाच वेळा माफी मागितली असती. कारण ती मोठी व्यक्ती आहे. मोठा नेता लवकर एक पाऊल मागे घेतो. शरद पवार आमचे चांगले मित्र आहे. ते आमच्यावर प्रेम करतात. सुप्रिया सुळेंचा आमच्यावर स्नेह आहे.

माझा विरोधही फार मोठा नाही, मी अशी कोणती मोठी अट घातली नाही. माझी अट एवढीच आहे की, तुमचं मत परिवर्तन झाले आहे, तुम्ही येऊ इच्छित असाल तर माफी मागा. आमची माफी मागायची नसेल तर आमच्या देशातील संतांची माफी मागा की, जी चूक झाली ती झाली. पुढे चूक होणार नाही, तसे वचन द्या. त्यांनी अयोध्याला यावे असे आवाहन संत करतील. आम्ही त्यांचा राजतिकल करू, असे मत बृजभूषण सिंह यांनी व्यक्त केले.

दरम्यान, राज ठाकरे यांना अयोध्येत येऊन रामाचे दर्शन घेण्याला टोकाचा विरोध करणारे बृजभूषण सिंह यांचा बोलावता धनी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता, त्याचे उत्तर मिळाले आहे असे एका भाजप नेत्याने म्हटले आहे.