जळगाव जिल्हा बँक एकनाथ खडसे यांच्या ताब्यातून गेली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जळगाव जिल्हा बँक एकनाथ खडसे यांच्या ताब्यातून गेली

अध्यक्षपदी संजय पवार तर उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची निवड

जळगाव - राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार  संजय पवार यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर एकनाथ खडसे यांचे समर्थक असलेल्या ॲड रवींद्र पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. उपाध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अमोल पाटील बिनविरोध निवडून आलेले आहे. इतकंच काय ठाकरे गटासह काँग्रेसनेही महाविकास आघाडीत बंडखोरी केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दूर ठेवत इतर सर्वच पक्षांनी एकत्र येत जिल्हा बँक ताब्यात घेतली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या हातून जिल्हा बँकही गेल्याचं दिसून येत आहे.

जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान झालं. यामध्ये संजय पवार विजयी झाले आहेत.

आयत्या वेळी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी संजय पवार यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला, त्यांना सूचक म्हणून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तर अनुमोदक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष शामकांत सोनवणे यांनी अनुमोदन दिलं होतं.

 जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महाविकास आघाडी व शिवसेना (शिंदे गट) यांची संयुक्त सत्ता होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दहा, शिवसेना शिंदे गटाचे पाच, कॉंग्रेसचे तीन, शिवसेना ठाकरे गटाचे दोन, तर भाजपचा एक सदस्य आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटाचे आहेत. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे बँकेचे नेतृत्व आहे. 

जळगाव जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेवर सत्ता असणं हे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व असल्यासारखं असतं. त्यासाठी जिल्हा बँक आपल्या ताब्यात असावी असं अनेक बड्या नेत्यांना वाटत असतं. आणि तसा प्रयत्न देखील केला जातो.

दरम्यान, जळगावमध्ये एकनाथ खडसे यांच्या हातून जिल्हा बँकही गेल्याने एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये जसे स्थानिक पातळीवर अनेकदा विरोध पाहायला मिळत होता अगदी तसाच अनुभव एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ लागल्याची चर्चा आहे.