चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? – दै. सामना

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? – दै. सामना

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी नाही. त्याचवेळी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन आमदारांना अत्यंत नाजूक स्थितीस मतदानासाठी उचलून आणले जात आहे. हे दोन्ही आमदार कर्करोगाशी झुंजत आहेत. व्हेंटिलेटर त्यांचा श्वास आहे, असे म्हणतात. पण राजकीय स्वार्थ असला की, माणुसकी तुडवून त्यांना स्ट्रेचर आणि व्हीलचेअरवरून मतांसाठी आणले जात आहे. विजयाची आणि चमत्काराची इतकीच खात्री असताना हे अमानुष, अघोरी प्रयोग कशासाठी? पण राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही अमानुष थरापर्यंत घसरू शकतो, असे 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.

दुसरीकडे, विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मग अशावेळी भाजप पक्ष मागे कसा राहणार? पक्षाने दिलेले आदेश पाळणे, हे आमच्या रक्तामध्येच भिनलं आहे. त्यामुळे मी आज पक्षाच्या मतदानासाठी जात आहे, अशी प्रतिक्रिया मुक्ता टिळक यांनी दिली. मुक्ता टिळक यांनी दाखवलेल्या या इच्छाशक्तीचे प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या पक्षावर किती निष्ठा असावी, हे मुक्ता टिळक यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेही पुन्हा एकदा भाजपासाठी तारणहाराची भूमिका बजावत आहेत. कारण, गंभीर आजारी असतानाही रुग्णवाहिकेतून जाऊन राज्यसभा निवडणुकीत मतदान केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते आपल्या पक्षासाठी विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यास रुग्णवाहिकेद्वारे मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना विजयाचं श्रेय दिलं होतं.

आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही महिन्यांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन जून रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. राज्यसभेच्या वेळी जगताप हे मतदानासाठी जाणार का? अशा चर्चा होत्या. परंतु, त्यांच्या कुटुंबाने आणि स्वतः जगताप यांनी निर्णय घेऊन ते रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले होते.