पावसात कोल्हापूरकरांना प्यायला मिळतोय बीटाचा गुलाबी चहा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पावसात कोल्हापूरकरांना प्यायला मिळतोय बीटाचा गुलाबी चहा

   कोल्हापूर , (प्रबोधन न्यूज )   -  रिमझिम पावसात वाफळणारा चहा प्यायला बऱ्याच जणांना आवडतो. कामानिमित्त घराबाहेर असणारे तर पाऊस पडू लागल्यावर रस्त्याकडेला चहाच्या गाड्यावरच्या कडक चहाला पसंती देतात. कोल्हापुरात सध्या एका वेगळ्या चहाची चर्चा  आहे. तो म्हणजे बीट पावडर वापरून केलेला गुलाबी अमृततुल्य चहा. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयाच्या जवळच्या चौकात हा खास चहा मिळू लागला आहे.

सीपीआर चौकात कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रोडवर अगदी सिग्नलच्या शेजारीच हे गुलाबी अमृततुल्य चहाचे छोटेसे दुकान आहे. संतोष कुमार नवले यांनी हे चहाचे दुकान सुरू केले आहे. याआधी ते फुलांचे डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करत होते.  ते स्वतः चहाप्रेमी असल्यामुळे त्यांनी पावसाळ्यात चहाचा व्यवसाय सुरू केलाय.

सध्या जागोजागी आपल्याला अमृततुल्य चहा पाहायला मिळत असतो. मात्र आपल्याला अमृततुल्य पेक्षा काहीतरी वेगळा चहा असावा म्हणून मग हा गुलाबी रंगाचा चहा बनवण्याचा विचार संतोष नवले यांच्या डोक्यात आला. त्यासाठी त्यांनी मग विचार सुरू केला. त्यात सेंटेड पावडर किंवा रंग वापरून असा रंग न आणण्याचे त्यांनी ठरवले होते. खरंतर गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांपासून हा गुलाबी रंग मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण शेवटी त्यांनी बिटाचा वापर करूनच हा गुलाबी रंग आणण्याचे ठरवले आणि तो विचार सत्यात देखील उतरवल.

बीटापासून मिळवला गुलाबी रंग..

चहामध्ये बीट वापरून रंग आणण्यासाठी संतोष यांनी बीटाची पावडर करुन चहा मध्ये वापरली आहे. यावेळी बीट असल्यामुळे चहाची चव बदलणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. अमृततुल्य चहाचा मसाला आणि त्यातच मिसळलेली बीट पावडर असे मिश्रण नवले आपल्या एका मित्राकडून बनवून घेतात.

असा बनतो गुलाबी अमृततुल्य चहा..

1) एक लिटर दुधापासून हा गुलाबी चहा बनवताना सर्वात आधी दूध उकळत ठेवले जाते.

2) दुधाला उकळी आल्यावर त्यामध्ये एक पाऊच चहा पावडर, साखर, इलायची, चहाचा मसाला आणि बीट पावडर असे मिश्रण मिसळले जाते.

3) हे मिश्रण टाकल्यावर पुन्हा एकदा उकळी द्यावी लागते.

4) त्यानंतर त्यामध्ये फक्त एक छोटा ग्लास साखर टाकावी लागते. (चहाच्या मसाल्यात देखील थोडी साखर मिसळलेली असते.)

5) मग चहा मस्त उकळला जातो.

6) साधारण 5 मिनिटे चहा उकळल्या नंतर त्याला छान गुलाबी रंग प्राप्त होतो. तसेच मस्त सुगंधही दरवळू लागतो.

7) हा वाफाळणारा चहा मग ग्राहकांना प्यायला दिला जातो.