गडचिरोली जिल्हयात मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नाही याबाबत सरकारने सभागृहात निवेदन करावे - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज ) - गडचिरोली जिल्ह्यात रुग्णवाहिके अभावी मृतदेह दुचाकीवर नेण्यात आला. याप्रकरणाची सरकारने तात्काळ दखल घ्यावी. महाराष्ट्रभर रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सरकार सांगत आहे मग इथे का उपलब्ध झाली नाही? त्याबाबत सरकारने अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन सादर करावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे. अशा प्रकारे मृतदेह दुचाकीला खाट बांधून न्यावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने यामध्ये तात्काळ लक्ष घालावे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले.
सन्माननीय सदस्य श्री. विलास पोतनीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रुग्णवाहिका न मिळाल्याने मृतदेह दुचाकीला खाट बांधून मूळ गावी घेऊन जावे लागल्याचा विषयाबाबत २८९ अंतर्गत सूचना मांडली होती.