भाऊंनी गंभीर आजारी असूनही रुग्णवाहिकेतून मुंबईत येऊन मतदान केले

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भाऊंनी गंभीर आजारी असूनही रुग्णवाहिकेतून मुंबईत येऊन मतदान केले

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सहापैकी पाच जागेवरील उमेदवार सहज विजयी होतील, मात्र, सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये काटे की टक्कर आहे. दोन्ही पक्षांसाठी एक-एक मत महत्त्वाचे आहे. यामुळे पुण्यातील भाजपाचे आमदार गंभीर आजाराचे रुग्ण आमदार लक्ष्मणराव जगताप “पक्षाला आज माझी गरज आहे” असे म्हणून मतदानासाठी रुग्णवाहिकेतून विधान भवनात पोहोचले आहेत!

सकाळीच पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी या आजारी आमदारांना “प्रकृती ठीक असेल तरच या” असे सांगितले होते. आज पक्षाला गरज आहे. डॉक्टरांनीही प्रवास करु शकतात असे सांगितले आहे. त्यामुळेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला” असे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त आहेत. असे असतानाही पक्षाला आपली गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर २ जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.