बिबवेवाडीत दोन टोळक्यांच्या दुष्मनीतून तरुणाला संपवण्याचा डाव उधळला ! 12 तासांत 12 जणांना अटक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

बिबवेवाडीत दोन टोळक्यांच्या दुष्मनीतून तरुणाला संपवण्याचा डाव उधळला ! 12 तासांत 12 जणांना अटक
पुणे -
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी 12 तासांच्या आत गजाआड केले. हत्येचा प्रयत्न करणे, वाहनांची नासधूस करणे आणि दहशत माजवण्याचे प्रकार या टोळीकडून सुरु होते. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 12 तासांच्या आतच या टोळीच्या मुसक्या आवळल्या. वाढदिवशीच एका टोळीतील तरुणाला संपवण्याचा डाव आखण्यात आला होता. पण त्यासाठी हल्ला करायला केल्यानंतर पळ काढलेल्या तरुणानं बदला घ्यायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे बदला घेण्यासाठी जेव्हा प्रतिहल्ला करण्यात आला, तेव्हा माजवण्यात आलेल्या दहशतीमुळे नागरिकांनी अखेर पोलिसात धाव घेतली आणि हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

यासंबंधी मिळालेली माहिती अशी. दोन गटात वाद सुरु होता. काकडे वस्तीत राहणारा अमीर खान आणि शेळके वस्तीत राहणार सूरज आणि आकाश कोळी यांचं एप्रिल महिन्यापासूनच भांडण सुरु होता. डिसेंबर महिन्यात या भांडणारा उद्रेक झाला. वाढदिवस साजरा करत असताना शेळके वस्तीतील सूरज कोळी आणि त्याचे साथीदार अमीरला मारण्यासाठी गेले. त्यामुळे अमीर आणि त्याचे मित्र स्वतःला वाचवण्यासाठी पळून गेले. त्याच दिवशी रात्री उशिरा अमीर खान त्याच्या मित्रांना हत्यारांनिशी गेऊन सूरज आणि त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी शेळके वस्तीत शिरले. पण घरं माहीत नसल्यानं त्यांनी शेळके वस्तीतील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली.

यावेळी अमीर आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या तोडफोडी 2 ऑटो रिक्षा आणि एका टेम्पोच्या काचेची नासधूस करण्यात आली. कोयते आणि तलवारींनी वार कर दुचाकी आणि मोपेड गाडीवरही वार करण्यात आले. मोठमोठ्या आरडाओरडा करन दहशत माजवण्याचाही प्रयत्न या गुंडांकडून सुरु होता. इतकंच काय तर वस्तीत राहणाऱ्या निष्पाप नागरिकांवरही या टोळीनं धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या सगळ्या प्रकरणी प्रचंड दहशतीत असलेल्या वस्तीतील लोकांनी अखेर पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 6 जणांना बेड्या ठोकल्या.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकानं कारवाई केली. या कारवाई तक्रार केल्यापासूनच्या 12 तासांच्या आतच सर्व 12 जणांना अटक करण्यात आली. यावेळी सर्व संशयित आरोपींकडून त्यांच्याकडील हत्यारंही पोलिसांनी जप्त केली आहे.