मोदींनी इंधन दरवाढीचे खापर फोडले राज्य सरकारांवर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, दि. २७ एप्रिल – देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. यादरम्यान पंतप्रधानांनी लसीकरण आणि खबरदारीबाबत चर्चा केली. याच बैठकीत मोदींनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून राज्यांना त्यांचा व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे.
पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला माहिती आहे की भारत सरकारला येणारा 42 टक्के महसूल राज्यांना जातो. अशा परिस्थितीत मी राज्यांना सहकार्य करण्याची विनंती करतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही तुमच्या राज्याच्या आणि शेजारच्या राज्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या. आज पेट्रोल तामिळनाडूमध्ये 111 रुपये, जयपूरमध्ये 118, हैदराबादमध्ये 119 पेक्षा जास्त आहे. मुंबईत 120 आणि शेजारच्या दमण दीवमध्ये 102 आहे.
आज भारताच्या अर्थव्यवस्थेत केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. युद्धाच्या वातावरणात दिवसेंदिवस आव्हाने येत आहेत. अशा संकटाच्या काळात केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय वाढवणे अधिक आवश्यक झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा विषय सर्वांसमोर आहे. देशवासीयांवर त्यांच्या वाढत्या किमतींचा बोजा कमी करण्यासाठी राज्यांना त्यांचे कर कमी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यानंतर काही राज्यांनी कर कमी केले, परंतु काही राज्यांनी त्याचा लाभ त्यांच्या नागरिकांना दिला नाही, त्यामुळे या राज्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत.
कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या सावटामुळे पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबतची ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत देशभरात कोरोनाचा बूस्टर डोस मोफत देण्याचा प्रस्ताव जारी केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.