पुणे-लोणावळा-पुणे लोकलच्या फेऱ्या लवकरच होणार पूर्ववत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. २७ एप्रिल – कोविडच्या काळात लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर सुरू झाली पण कमी क्षमतेने म्हणजेच रोज २६ फेऱ्या होऊ लागल्या. लोकलच्या कमी संख्येमुळे त्याचा त्रास दररोज अपडाऊन करणाऱ्यांना होत होता. नागरिकांकडून लोकलची सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत होती. या मागणीचा विचार होऊन लोकलची संख्या पूर्ववत म्हणजेच रोज ४२ फेऱ्या येत्या महिनाभरात सुरू होणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान कामशेत रेल्वे स्टेशनजवळ भूमिगत काम सुरू आहे. त्यास साधारण १ महिना लागणार आहे. त्यानंतरच पूर्ववत लोकल धावणार आहे. मात्र प्रवाशांच्या मानाने ४२ फेऱ्याही कमी असल्याची माहिती प्रवासी संघटनांनी दिली आहे. यात वाढ करावी अशी मागणी करण्यात येत आहे. वास्तविक पुण्याहून दररोज हजारो कामगार लोकलने प्रवास करीत असतात. वेळेच्या दृष्टीने तसेच खर्चाचा विचार करता लोकलचा प्रवास परवडतो असे चाकरमान्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हजारो चाकरमाने तसेच उद्योजकांची पसंती लोकलला आहे. मात्र प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने त्याचा ताण लोकलवर येतो. लोकलच्या फेऱ्या अधिक वाढल्यास प्रवास सुखकर होईल.