रशियाच्या ‘या’ धोकादायक क्षेपणास्त्राला ‘सैतान’ का म्हणतात? चाचणीने जग हादरले !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दोन महिने उलटले आहेत, परंतु अद्यापही दोन्ही देशांमध्ये समेट झालेला नाही. युक्रेन अण्वस्त्रधारी रशियाला कडवी टक्कर देत आहे. रशियाने युक्रेनमध्ये कहर केला आहे. या भीषण युद्धात रशिया किंवा युक्रेन दोघेही मागे हटायला तयार नाहीत. आता याचदरम्यान रशियाने अशाच एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असून, त्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.
रशियाने ज्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे त्याचे नाव आहे, सरमत (Sarmat ICBM). रशियन भाषेत सरमत म्हणजे सैतान. या क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन म्हणाले की रशियाविरोधी पाऊल उचलण्यापूर्वी ते क्रेमलिनच्या शत्रूंना दोनदा विचार करण्यास भाग पाडेल. रशियाचे ‘सरमत’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल बैलेस्टिक मिसाइल आहे. चला जाणून घेऊया या जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राविषयी.
जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र ‘सरमत’चे वजन 208 टन असून त्याची लांबी 114 फूट आहे. या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 15 अणुबॉम्ब लावले जाऊ शकतात. हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र अत्यंत धोकादायक आणि विनाशकारी आहे.‘सरमत’ क्षेपणास्त्राच्या वर 10 किंवा त्याहून अधिक वॉरहेड्स बसवता येतात. 2002 मध्ये रशियाने ते बनवण्यास सुरुवात केली. त्याची रचना अशी आहे की क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालीला फसवू शकते.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, ‘सरमत’ क्षेपणास्त्रात जगात कुठेही मारा करण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र सर्वात लांब पल्ल्यापर्यंत विनाश घडवू शकते, असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
सरमत ICBM क्षेपणास्त्र 3 मीटर व्यासासह 35.5 मीटर लांब आहे. यामध्ये 10 ते 15 वॉरहेड्स बसवता येतात म्हणजेच ते एकाच वेळी 15 ठिकाणी हल्ला करू शकतात.
या धोकादायक क्षेपणास्त्राची रेंज 18 हजार किमी आहे. रशिया या क्षेपणास्त्राने जगात कुठेही हल्ला करू शकतो. यासोबत ते 20.7 मॅकच्या वेगाने उडते. म्हणजेच ते ताशी 25,560 किलोमीटर वेगाने उडते.
या क्षेपणास्त्राची मार्गदर्शन प्रणाली रशियाने विकसित केलेल्या ग्लोनास या नेव्हिगेशन प्रणालीवर आधारित आहे. सरमत क्षेपणास्त्राला दुसरे शैतान म्हटले जाते. रशियाने त्यांच्या ‘फर्स्ट डेव्हिल’ म्हणजेच R-36M ICBM क्षेपणास्त्राची जागा घेण्यासाठी हे तयार केले आहे.
युक्रेन युद्धाच्या काळात रशियाने पहिल्यांदाच जगातील सर्वात धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. या क्षेपणास्त्राचा वर्षाअखेरीस रशियाच्या सैन्यात समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.