ही आहे भारताची आधुनिक रेल्वे ! प्रवाशांकडून चक्क ट्रेनला 'दे धक्का' !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

ही आहे भारताची आधुनिक रेल्वे ! प्रवाशांकडून चक्क ट्रेनला 'दे धक्का' !

मेरठ, दि. 5 मार्च - याला देशाचे दुर्दैव म्हणा अथवा नशीब म्हणा की आता रेल्वेनेही प्रवाशांना धक्का द्यायला लावून त्यांना स्वावलंबी बनवले आहे ! असेच मजेदार दृश्य आज सकाळी मेरठमधील दौराला रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले, जेव्हा रेल्वे प्रवाशांनी पॅसेंजर ट्रेनला 'दे धक्का' म्हणत ढकलून रेल्वेला रुळावरून चालवले. प्रवाशांनी पॅसेंजर ट्रेन रुळावरून अक्षरशः पळवली. काय घडलं होतं नेमकं, जाणून घेऊया. 

मेरठमधील दौराला रेल्वे स्थानकावर आज एक अदभुत दृश्य पाहायला मिळाले. जेव्हा प्रवाशांची पलटण एका पॅसेंजर ट्रेनला ढकलताना दिसली. भारतीय रेल्वेच्या असहायतेचे हे अदभुत दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. धक्का मारणाऱ्यांना असं का करावं लागलं असे विचारता ते म्हणाले की, आम्ही रेल्वेला धक्का मारून रुळावर आणले तरच आम्हाला प्रवास करता येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज पहाटे झालेल्या अपघातात या ट्रेनला भीषण आग लागली होती. सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या या पॅसेंजर ट्रेनला सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर अचानक आग लागली. आगीमुळे रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने हा अपघात झाला होता. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे.

दौराला रेल्वे स्थानकाला लागलेल्या आग लागलेल्या डब्यांव्यतिरिक्त उर्वरित डबे प्रवाशांनी दूर ढकलत नेले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रवाशांनी ट्रेनला ढकलल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, प्रवासी ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत आणि उर्वरित डबे इंजिन आणि दोन डब्यांपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.