वीज बिलासाठी आता प्रीपेड कार्ड – अजित पवार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बारामती, दि. १८ एप्रिल - कोळसा टंचाईमुळे राज्यात लोडशेडिंगचे संकट वाढत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात प्रीपेड कार्डद्वारे वीज पुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. प्रीपेड कार्ड योजनेमुळे वीज चोरीचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जसं मोबाईलला रिचार्ज केल्यामुळे कॉलिंग सुरू होतं त्याचप्रमाणे कार्डला रिचार्ज केल्यानंतर गरजे इतकी वीज वापरता येणार आहे.
अजित पवार म्हणाले की, 'राज्यात कोळशाच्या संकटामुळे विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. पर्यायाने लोडशेडिंग करावं लागत आहे. आम्ही काही कोळसा परदेशातून आयात करण्याचा प्रयत्न केला. पण आपले पावर प्लांट असे आहेत की त्यात परदेशी कोळसा १००% चालत नाहीत. आता उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तीन ते चार हजार मेगाव्हॉट विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यांतून जास्त पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या देशात विजेची टंचाई निर्माण झाली आहे.'
सध्या उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून वीज निर्मितीसाठी प्रयत्न केला जातो आहे. मात्र, लोकांनी वापरलेल्या विजेचं बिल भरणंही आवश्यक आहे. सध्या वीज चोरीचे प्रमाण वाढले असल्याने राज्य सरकार प्रीपेड कार्डचा पर्याय आणत आहे. जशी गरज असेल तसे कार्ड रिचार्ज करून विजेचा वापर करावा, असा पर्याय आणायचा विचार सरकार करत असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, 'आता यापुढे आकडा बंद करावाच लागेल. आकड्यांमुळे सरकारची वाट लागली आहे. लोकांना चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर मानसिकता बदलावी लागेल. नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून विजेचा प्रश्न सोडवावा लागणार आहे, असंही पवार म्हणाले.