वेळ पडली तर परदेशातून कोळसा आयात करू – अजित पवार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वेळ पडली तर परदेशातून कोळसा आयात करू – अजित पवार

पुणे, दि. 22 एप्रिल – राज्यात कोळशाची टंचाई निर्माँण झाल्याने वीज निर्मितीत व्यत्यय निर्माण होत आहे. परिणामी राज्याला लोड शेंडिंगची समस्या भासू लागली आहे. परंतु सरकार वीज निर्मितीसाठी कोळशाची टंचाई भासू देणार नाही. वेळ पडली तर विदेशातून कोळसा आयात करू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह नितीन राऊत यांनी लोडशेडिंगच्या परिस्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. दिली. “सुरळीत वीज पुरवठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशपातळीवर कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र सरकार छत्तीसगडमधे कोळशाची खाण विकत घेण्याचा विचार करत आहे. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील सरकार काँग्रेसच्या विचारांचं असून सोनिया गांधींनी त्यासंबंधी सरकारला सांगितलं आहे. त्याचबरोबर परदेशातून देखील कोळसा आयात करण्यात येणार आहे. त्यासंबंधी निर्णय घेतला आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली

उर्जा मंत्री नितीन राऊत, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अन्य महत्वाच्या व्यक्ती कोळशाचा नियमित पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोळशाच्या टंचाईबद्दल मी कोणालाही दोष देऊ शकत नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

सांगली येथे राष्ट्रवादीच्या झालेल्या सभेत अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता अजित पवार संतापले व ते म्हणाले की, “माझं नेहमी स्पष्ट मत असतं आणि तुम्हा सर्व मीडियाला माहिती आहे. तुम्ही नेहमी मला असले प्रश्न विचारत असता की याने असं वक्तव्य केलं त्याबद्दल तुमचं मत काय आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी मत व्यक्त करत असताना कुठल्या समाजाबद्दल, घटकाबद्दल अवमान होणार नाही तसंच नाराजी वाढणार नाही याचं तारतम्य ठेवूनच वक्तव्यं केली पाहिजेत”.