'हा' किडा तुम्हाला बनवू शकतो करोडपती !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

'हा' किडा तुम्हाला बनवू शकतो करोडपती !

खादा किडा तुम्हाला करोडपती बनवू शकतो, असे कोणी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल.. आज आम्ही तुम्हाला अशाच एका किटकाबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्ही थक्क व्हाल. अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते ज्यासाठी ते खूप पैसे खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का की असा एक किडा आहे ज्याला पाळण्यासाठी लोक लाखो रुपये देऊन खरेदी करतात. आता तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरे आहे.

असा एक दुर्मिळ कीटक या पृथ्वीवर आढळतो, ज्याच्या देखभालीसाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. या दुर्मिळ कीटकाची किंमत इतकी आहे की तुम्ही एक अलिशान घर घ्याल. जिथे काही लोक किटकांचा तिरस्कार करतात तिथे ते विकत घेण्यासाठी काही लोकांमध्ये स्पर्धा असते, हा एक मजेदार योगायोग म्हणावा लागेल. हा किटक विकत घेण्यासाठी लोकांमध्ये स्पर्धा होण्यामागे एक खास कारण आहे. चला जाणून घेऊया या खास किटकाबद्दल आणि लोकांना ते का विकत घ्यायचे आहे?

या किड्याला एवढी मागणी का आहे, असं काय आहे या किड्यात ?

जगातील हा बहुमोल किडा 'स्टॅग बीटल' म्हणून ओळखला जातो. या दुर्मिळ कीटकांचा आकार दोन ते तीन इंचापर्यंत असतो. स्टॅग बीटल पृथ्वीवरील सर्वात लहान, विचित्र आणि दुर्मिळ प्रजातींपैकी एक असल्याचे मानले जाते. युरोप आणि उत्तर अमेरिकेत आढळणारा हा कीटक इतका महाग का असतो, हे जाणून घेऊया. एखादा कीटक विकत घेण्यासाठी 50 रुपयेही खर्च करणे आपण समजू शकतो, मात्र हा किडा खरेदी करण्यासाठी लोक अक्षरशः एक कोटी रुपये खर्च करायला तयार असतात.. स्टॅग बीटल हा लुकॅनिडी कुलातील एक कfटक आहे. दुर्मिळतेमुळे ते इतके महाग विकले जाते.

हा किडा त्याच्या काळ्या डोक्यातून बाहेर पडणाऱ्या शिंगांवरून तुम्ही ओळखू शकता. या कीटकाचा सरासरी आकार २ ते ४.८ इंच असतो. काही वर्षांपूर्वी एका जपानी ब्रीडरने त्याचे स्टॅग बीटल सुमारे ६५ लाख रुपयांना विकले होते. एक कोटी रुपयांपर्यंत खर्च करून लोक हा किडा खरेदी करण्यास तयार आहेत. लोक या कीटकांची देखरेख अगदी उत्तम ठेवतात. एका दाव्यानुसार या कीटकांपासून अनेक औषधे बनवली जातात. कदाचित हे पण या कीटकांच्या महाग असण्यामागचे कारण असू शकेल.
ब्रिटीश लोककथेनुसार, स्टॅग बीटल्सने मेघांना आणि विजेच्या वादळांना बोलावले होते, ज्याने मध्ययुगीन लोकांना घाबरवले, त्यांचा असा विश्वास होता की हे बीटल्स त्यांच्या जबड्यात गरम निखारे घेऊन इमारतींना आगी लावतात.
ही प्रजाती थॉर या विजेच्या देवतेशी संबंधित आहे असाही एक समज आहे.  जर तुम्ही या किटकाला तुमच्या कपाळावर ठेवले तर तो तुम्हाला विजेचा धक्का बसण्यापासून वाचवेल..अर्थात, पुन्हा हे  एक मिथक आहे, त्यामुळे आताच्या काळात कृपया हा प्रयत्न करू नका !
हा किडा उबदार ठिकाणी राहतो. हिवाळ्यात अनेक स्टॅग बीटल्स मरतात. हे उबदार ठिकाणी खताच्या ढिगाऱ्याखाली आणि थंड ठिकाणी कचऱ्याच्या खाली टिकून राहू शकते. स्टॅग बीटल सुमारे सात वर्षे जगू शकते.