कला- क्रीडा- संस्कृतीला नवीन अभ्यासात समान स्थान - डॉ विद्यासागर
भाग्यश्री फिल्म्स निर्मित शिवाजी घोडे दिग्दर्शित "मी खानदानी पोरगी हाय" या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नविन शैक्षणिक धोरणात कला-क्रीडा-संस्कृती विषयाला इतर अभ्यासक्रमा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. गणित तर्कशास्त्राएवढेच भावना नवोन्मेष आणि नवनिर्मितीला आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडीत विद्यासागर यांनी केले.
शब्द पब्लिसिटी आणि भाग्यश्री फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्राईड ऑफ़ महाराष्ट्र पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी प्रसिद्ध गायक पं. कल्याण गायकवाड, आयपीएस कॅंपसचे संचालक डॉ सुधाकर बोकेफोडे,शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे, भाग्यश्री फिल्म्सच्या संचालिका रेखा घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी भाग्यश्री फिल्म्स निर्मित शिवाजी घोडे दिग्दर्शित "मी खानदानी पोरगी हाय" या व्हिडिओ अल्बमचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विजय भिसे (सांस्कृतिक), डॉ वैभव लाडे (वैद्यकीय), पुष्पा व्ही. पिल्ले अध्यापन, निलम मेहता (शैक्षणिक) मनिष कोल्हटकर, संचालक मंदार किराणे (औद्योगिक), सीए पुष्पराज संघवी (युवा) यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी "मी खानदानी पोरगी हाय" या गाण्याचे मुख्य अभिनेत्री धनश्री घोडे, मुख्य अभिनेता महेंद्र भांगे, गीतकार महेंद्र पाटोळे, गायिका पल्लवी घोडे, सहाय्यक दिग्दर्शक विकास इनामदार, सहकलाकार संतोष वाघमारे, सोहेल मुल्ला, अजित पोतदार, मुकेश चौकेकर, रोहन खिलारे, पार्थ मेने, कृष्णा जावळे, गणेश देवकर, महादेव हुंबऱे, वैभवी क्षीरसागर, सानिया पठाण, दिपाली धस, स्नेहा घोडे यांचे देखील यावेळी सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली पवार तर आभार धनश्री घोडे हिने मानले.