प्रिती झिंटा बनली आई ! सरोगसीद्वारे दिला जुळ्यांना जन्म 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रिती झिंटा बनली आई ! सरोगसीद्वारे दिला जुळ्यांना जन्म 
मुंबई -
अभिनेत्री प्रिती झिंटाच्या घरी जुळ्यांचं आगमन झालं आहे. सरोगसीद्वारे आई बनलेल्या प्रितीने सोशल मीडियावर पती जेनसोबतचा एक फोटो शेअर करून याची माहिती दिली आहे. तिने लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो, मला तुम्हा सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्यात 2 नवीन आनंद आल्याने आमची मनं प्रेमाने भरलेली आहेत. आम्ही जय झिंटा-गुडइनफ आणि जिया झिंटा-गुडइनफ यांचे पालक झालो आहोत.’

प्रितीने पुढे लिहिले की, ‘आम्ही आमच्या आयुष्याचा हा नवीन प्रवास एकत्र जगण्यासाठी उत्सुक आहोत. डॉक्टर, परिचारिका आणि जे आमचे सरोगेट होते त्यांचे खूप आभार. जय, आणि जिया यांना खूप खूप प्रेम.’

प्रीती आणि जेन यांचे 29 फेब्रुवारी 2016 रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर प्रीती पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहू लागली. लग्नानंतर प्रीतीने चित्रपटांपासून स्वतःला काहीसे दूर केले होते. ती फक्त कुटुंबासोबतच वेळ घालवत होती. त्यानंतर 2018 साली ती ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ आणि ‘भैयाजी सुपरहिट’ या 2 चित्रपटांमध्ये दिसली. दोन्ही चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ती चित्रपटांपासून दूर असली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी खूप संवाद साधत असे. याशिवाय ती आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आयपीएल सामन्यांमध्येही जात असे.

रिपोर्ट्सनुसार, प्रीती आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन देखील या चित्रपटात असणार आहेत. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करत आहे.