नागराज मंजुळे निर्माते, डायरेक्टर, अॅक्टर, लेखक सोबतच आता डॉक्टरही
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 25 मार्च - नागराज मंजुळे हे कमी कालावधीत अत्यंत गाजलेले नाव आहे. मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल डी वाय पाटील विद्यापीठानं नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट (D. Litt) ही पदवी दिली आहे. त्यामुळे ते आता डॉक्टर नागराज मंजुळे या नावानेही ओळखले जातील.
पिस्तुल्या, फॅंड्री, सैराट आणि आता झुंड असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट देऊन प्रेक्षक आणि रसिकांच्या मनात घर करणाऱ्या नागराज मंजूळे यांचा डी वाय पाटील विद्यापीठाकडून मोठा सन्मान करण्यात आला आहे. डी वाय पाटील विद्यापीठानं नागराज मंजुळे यांना सन्मानाची डॉक्टरेट पदवी दिली आहे. नागराज मंजुळे यांनी चित्रपट क्षेत्रात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा दिलेल्या विविध योगदानाबद्दल त्यांचा सन्मान केल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र प्रा. हनुमंत लोखंडे यांनी ही माहिती फेसबुकवर दिली आहे. नागराज मंजुळे यांचे डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे फोटो शेअर करत प्रा. लोखंडे यांनी मंजुळेंना उद्देशून म्हटलं आहे की, संघर्षाच्या काळात आपण एम.फिल किंवा सेट अथवा नेट व्हावे अशी आपली इच्छा होती. त्यासाठी आपण पुणे विद्यापीठात चकरा मारतानाचे दिवस आजही मला आठवतात. आपला डॉक्टर ऑफ लेटर्स पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. याचा साक्षीदार होणे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
चित्रपट क्षेत्रात पदार्पण केल्यापासूनच नागराज मंजुळे यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यावर भर दिला. पिस्तुल्या, फॅंड्री, सैराट आणि आता झुंड असे त्यांनी एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. सैराट हा मराठी भाषेत निर्मिती झालेला प्रादेशिक चित्रपट असूनही या चित्रपटाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. या चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा धंदा केला. या चित्रपटापूर्वी आलेला नागराज मजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटाचीही जोरदार चर्चा झाली. विशेष म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे 'ब्लॅक अँड व्हाईट' होता. या चित्रपटालाही अनेक विविध पुरस्कार मिळाले आहेत.