पठाण कुटुंबात जन्मलेल्या इरफानला घरातील लोक ब्राह्मण मुलगा का म्हणायचे ?
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली छाप सोडणारा अभिनेता इरफान खानची आज जयंती आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने जगाचा निरोप घेतला. ते कॅन्सरने त्रस्त होते पण आजही त्यांचे चाहते त्यांची आठवण काढतात. इरफानच्या चित्रपटांनी सर्व स्तरातील प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. इरफान खानचा जन्म 7 जानेवारी 1967 रोजी जयपूरमधील एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान होते. त्यांचे वडील टायरचा व्यवसाय करायचे.
एसी दुरुस्त करण्याचे काम सुरू केले
पठाण कुटुंबातील असूनही इरफान लहानपणापासूनच शाकाहारी होते. पठाण कुटुंबात ब्राह्मण मुलगा जन्माला आल्याचे सांगत त्यांचे कुटुंबीय त्यांना नेहमी चिडवायचे. इरफान खानचा सुरुवातीचा टप्पा संघर्षांनी भरलेला होता. ते एनएसडीमध्ये दाखल झाले त्याच दिवशी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी एसी दुरुस्तीचे काम सुरू केले. यादरम्यान त्यांची राजेश खन्ना यांच्याशी भेट झाली. इरफान राजेश खन्ना यांच्या घरी एसी ठीक करण्यासाठी गेले होते. राजेश खन्ना यांची लाईफस्टाईल पाहून इरफान खूप प्रभावित झाले.
शिकत असताना पहिला चित्रपट मिळाला पण...
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत असताना इरफानची सलाम बॉम्बेमधील एका मोठ्या भूमिकेसाठी मीरा नायरने निवड केली होती. त्या दिवसांत ते मुंबईतील कार्यशाळेतही गेले होते. पण नंतर त्यांना सांगण्यात आले की ते या चित्रपटाचा भाग नाही. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, ते रात्रभर रडत राहिले. तथापि, मीरा नायरने 18 वर्षांनी इरफान खानला 'द नेमसेक'मध्ये अशोक गांगुलीची भूमिका दिली.
सुतापाशी लग्न करण्यासाठी इरफान हिंदू बनण्यास तयार होते
इरफान खानने 23 फेब्रुवारी 1995 रोजी एनएसडीची मैत्रिण सुतापा सिकदरसोबत लग्न केले. इरफानच्या संघर्षाच्या दिवसांत सुतापा नेहमी पाठीशी उभी राहिली. सुतापाने 'सुपारी' आणि 'शब्द' सारखे चित्रपट लिहिले आहेत. इरफानने जेव्हा सुतापाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी तिच्यासाठी धर्म बदलण्याची तयारीही दर्शवली होती, परंतु सुतापाच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नासाठी सहमती दर्शवली, त्यानंतर इरफानला धर्म बदलण्याची गरज भासली नाही.
आठवणीत इरफान
इरफान खानने आपल्या करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. 32 वर्षांच्या कारकिर्दीत इरफानने असे काही चित्रपट केले आहेत जे मैलाचे दगड ठरले. विशेष म्हणजे इरफानला 'पान सिंग तोमर' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. इरफान नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध होते. इरफान आज आपल्यासोबत नाही पण त्यांचे चित्रपट आणि विविधांगी भूमिका नेहमीच लक्षात राहतील.