स्टील, सिमेटवर 5 % जीएसटी आकारण्याची एएमसीसीआयईची मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

स्टील, सिमेटवर 5 % जीएसटी आकारण्याची एएमसीसीआयईची मागणी

पिंपरी-चिंचवड, दि. 25 मार्च - वाढत्या महागाईमुळे घराचे स्वप्न हे स्वप्नचं राहिले आहे. पंतप्रधान यांचे स्वप्न प्रत्येकाला घर मिळावे सत्यात उतरवायचे असेल तर स्टील, सिमेंट सहित बांधकाम साहित्यावर फक्त 5 % जीएसटी करण्यात यावा, तसेच बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्यावा अशी मागणी अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड एज्यूकेशनने (एएमसीसायई) केली आहे. जीएसटीचे फक्त 5% आणि 10 % स्लॅब असावा, क्रिप्टो करंसी म्हणजेच आभासी चलनावर संपूर्णपणे बंदी आणावी, पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु करावे, तसेच बँक बुडाल्यास ठेवीदारांचे डिपॉजिटची संपूर्ण रक्कम व्याजासहित मिळावी अशा विविध मागण्या अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड एज्यूकेशनने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. यावेळेस  संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अगरवाल, पदाधिकारी कमलराज बंसल, विनोदराज सांकला, प्रदिप अगरवाल, नरेंद्र गोयल, मिठालाल जैन, कुणाल तोदी आदी उपस्थित होते.


याबात अधिक माहिती देताना चेंबरचे संस्थापक राजेश अग्रवाल म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून पुणे शहरात कार्गो सुविधा असलेले इंटरनॅशनल विमानतळाची मागणी होत आहे, याच अनुषंगाने सदर इंटरनॅशनल विमानतळ लवकरात लवकर उपलब्ध व्हावे अशी आमची मागणी आहे. कारण पुणे जिल्हा पश्‍चिम महाराष्ट्रासह सर्वच शहरात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी सुरु आहेत. मोठ-मोठ्या कंपन्या, आय टी हब, एज्यूकेशन हब आहेत, पर्यटनाबरोबर अनेक कंपन्याचे पदाधिकारी, शिक्षणासाठी विद्यार्थी वर्ग, तसेच माल आयात निर्यात केला जातो. या सर्व सुविधांसाठी इतर इंटरनॅशनल विमानतळावर अवलंबून न राहता ही कार्गो सुविधायुक्त इंटरनॅशनल विमानतळ पुण्यासारख्या शहरात मिळाली तर विद्यार्थी, कंपन्यासोबत शेतकर्यांनाही याचा लाभ होईल आणि पर्यायाने रोजगार वाढेल.


महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विनोदराज सांकला म्हणाले की, देशाच्या सर्व बँकात भारतीयांचे सुमारे 150 ट्रिलियन पेक्षा जास्त रक्कम डिपॉजिट म्हणून जमा आहे. हा सर्व पैसा उद्योग क्षेत्रा सोबतच सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचा, सिनियर सिटीजन्सचा आहे.  बँक बुडाल्यास खातेदाराचे पाच कोटी असले तरीसुध्दा सरकार फक्त पाच लाख रूपये परत देते. हे अन्यायकारक असून खातेदारांची संपूर्ण रक्कम व्याजासहित परत मिळण्याची तरतूद आरबीआयने करावी.


उद्योग कमिटीचे अध्यक्ष प्रदिप अगरवाल म्हणाले की, सरकारने क्रिप्टो करन्सीवर संपूर्णपणे बंदी आणावी. क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यामुळे व्यापऱ्यांचे दिवाळे निघत आहे. चेंबरचे संचालक नरेंद्र गोयल म्हणाले की, स्टार्टअप व महिलांना उद्योगासाठी स्वस्त दरात म्हणजेच सुमारे 4 % दराने कर्ज उपलब्ध करून द्यावा जेणेकरून रोजगार वाढेल.


 मिठालाल जैन म्हणाले, आम्ही सर्व पदाधिकारी वरील सर्व मागण्यांसाठी केंद्र व राज्यसरकार कडे पाठपुरावा करणार आहोतच परंतु उद्योग व व्यापार हितासाठी देशातील सर्व अन्य चेंबर व व्यापारी संघटनांनी आमच्यासोबत ह्या मागण्या लावून धराव्यात.


कुणाल तोदी म्हणाले की, अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड एज्युकेशन येत्या 5 वर्षात 5 हजारापेक्षा जास्त तरूण-तरूणी व महिलांना व्यापार व उद्योगक्षेत्रात येण्यास प्रवृत व मार्गदर्शन करणार आहोत. याचप्रमाणे अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड एज्यूकेशन माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत येत्या काहीकाळात अत्याधुनिक व सर्वसुविधांयुक्त पाचशे बेडचे हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून याच्याच जोडीला ब्लड बँक व डायग्नोस्टीक सेंटर, कॅथ लॅब ही उभारणार आहोत.