पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड, दि. 25 मार्च – भारताच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त विश्व मैत्री संघ भारतवर्ष तर्फे देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते 27 मार्चला दुपारी 2.30 वाजता प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे देण्यात येणार आहे अशी माहिती विश्व मैत्री संघचे मुख्य संयोजक आणि कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांनी दिली आहे. या पुरस्कर्त्यांमध्ये पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचाही समावेश आहे.
पुरस्कर्त्यांमध्ये श्रीपाद नाईक, महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती, भिकू इदाते, विजय भटकर, एल. निशिकांत सिंह, अनुराधा पौडवाल, नितीन मोरे, कृष्ण प्रकाश, वैभव डांगे, राजेश पांडे, हर्षवर्धन सपकाळ, विजय चौधरी, रामदास चव्हाणके, ओमप्रकाश रांका, डॉ. मनिष गवई, अजित ओझा, राजेश बडगुजर यांचा समावेश आहे.
कृष्ण प्रकाश हे मुळचे झारखंडमधील हजारीबाग येथील असून, 1998 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना आयरमॅन म्हणून ओळखले जाते. पोलीस आयुक्त पद स्वीकारतानाच त्यांनी पिंपरी-चिंचवड हे भयमुक्त, अपराधमुक्त, झिरो टॉलरन्स बनविणार असल्याचे जाहीर केले होते. कृष्ण प्रकाश यांची इनामदार, निर्भीड पोलीस अधिकारी, अतिशय कठोर म्हणून गणना केली जाते. ते उत्तम खेळाडू, पत्रकार, कवी, समाजसुधारक, धर्माचे जाणकार आहेत. त्यांनी मॅरेथॉन, सायकलिंग व इतर खेळांमध्ये पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या कार्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.