कंगना पुन्हा बरळली, पंजाबच्या शपधविधीवर म्हणाली तुकडे गँग पुन्हा अक्टिव्ह झाली

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कंगना पुन्हा बरळली, पंजाबच्या शपधविधीवर म्हणाली तुकडे गँग पुन्हा अक्टिव्ह झाली

नवी दिल्ली, दि. १५ मार्च - कंगनाने पंजाबमध्ये सरकार स्थापन होताच सरकारवर टिका केली आहे. कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केले आहे. त्यामध्ये तिनं म्हटलंय तुकडे तुकडे गँग पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे म्हणायची. कंगनाच्या या विधानामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर सडकून टीका केली आहे. यंदाच्या विधानसभेमध्ये पंजाबमध्ये आपनं मोठा विजय मिळवला आहे. आप पक्षाचे भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यावर कंगनानं टीका केली आहे.

आपल्या अभिनयासोबतच वेगवेगळ्या वादासाठी कंगना रनौत ही नेहमीच तिच्या बेताल वक्तव्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सध्याच्या घडीला बॉलीवूडमध्ये सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगनाकडे पाहिलं जातं. तिचं बॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींशी भांड़ण आहे. हल्ली कंगनानं राजकीय वक्तव्य करुन सनसनाटी निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं तर देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक होतं. खरं स्वातंत्र्य हे आपल्याला 2014 मध्ये मिळाल्याचे सांगितले होते. आताही कंगना तिच्या अशाच बेताल वक्तव्यानं चर्चेत आली आहे.