टीएमसीला मोठा झटका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

टीएमसीला मोठा झटका; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली -

कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आज एक महत्त्वाचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणुका पुढे ढकलणे ही कोणत्याही लोकशाहीतील शेवटची पायरी असते आणि आम्ही याच्या विरोधात आहोत. असे केले तर चुकीची परंपरा सुरू होईल. याबाबत टीएमसीने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने 11 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा सरकारला निर्देश दिले होते की, TMC सह कोणत्याही राजकीय पक्षाला कायद्यानुसार त्यांचे निवडणूक अधिकार वापरण्यापासून आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शांततापूर्ण आणि सुव्यवस्थित प्रचार करण्यापासून रोखले जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय सहभागाचा अखंड अधिकार मिळावा यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. टीएमसी आणि राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांच्या याचिकेवर त्यांनी राज्य सरकारला नोटीस बजावली होती, ज्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि प्रतिनिधींवर व्यापक हिंसाचाराचा आरोप करत संरक्षणाची मागणी केली होती.

ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील पक्षाने त्रिपुरातील पक्षाच्या नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल दिवसभरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेटीची वेळ मागितली आहे. विशेष म्हणजे आगरतळा महानगरपालिका (AMC) आणि ईशान्येकडील 12 इतर नगरपालिकांच्या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. याआधी सोमवारी, राज्य पोलिसांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि टीएमसी या दोघांना आगरतळा येथे रॅलीसाठी परवानगी नाकारली. तृणमूल युवक काँग्रेसच्या प्रमुख सयोनी घोष यांच्या त्रिपुरा पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात खासदारांनी राष्ट्रीय राजधानीत धरणे आंदोलन करण्याची योजना आखली आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब उपस्थित असलेल्या जाहीर सभेत गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली घोष यांना रविवारी अटक करण्यात आली.

पश्चिम त्रिपुराचे अतिरिक्त एसपी बीजे रेड्डी म्हणाले की, शयानी घोषला आगरतळा पोलिसांनी अटक केली कारण ती भाजप कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होती. हे भाजप कार्यकर्ते जाहीर सभेत होते. पुराव्याच्या आधारे, आयपीसीच्या कलम 307, 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.