पंतप्रधान मोदी यांच्या आईने केले आज १०० व्या वर्षात पदार्पण (व्हिडिओ)
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
अहमदबाद, (प्रबोधन न्यूज) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांची आज भेट घेतली. आज हिबेन या वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त मोदींनी आईची भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत. हिराबा या नावानेही अनेकजण हिराबेन यांना ओळखतात. पंतप्रधान मोदींनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत. मोदींनी या फोटोंना एक छान कॅप्शनही दिली आहे.
“आज मी आईचे आशिर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हिराबा आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून ते आईशी हसून चर्चा करत आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, पूजा केली आणि त्यानंतर डोळ्यांना पाणी लावून आशीर्वाद घेतले. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय. तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशिर्वाद घेताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले असून पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांना सव्वापाच हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.