राष्ट्रपतीपदाची निवडणूक; ममतांनी सुरू केली मोर्चेबांधणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रपतीपदाची निवडणूक; ममतांनी सुरू केली मोर्चेबांधणी

भाजपकडे जिंकण्याएवढे मताधिक्य नाही; 13 हजार मतांची कमतरता

शरद पवार उभे राहणार असतील तर महाराष्ट्र काँग्रेस पाठीशी राहणार

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने एकजूट होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी देशातील 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून 15 जूनला दिल्लीत बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षांच्या नेत्यांची १५ जूनला दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये दुपारी ३ वाजता बैठक बोलावली आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजदचे लालूप्रसाद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह विविध विरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जूनला काढण्यात येणार आहे. २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. या निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान होऊन, २१ जुलैलाजी मतमोजणी करण्यात येईल. निवडणुकीसाठी एकूण १० लाख ८६ हजार ४३१ मतांपैकी केंद्रातील सत्ताधारी भाजपकडे ४८.९ टक्के मते असून, बहुमतासाठी आणखी १३ हजार मतांची आवश्यकता आहे. सर्व विरोधी पक्ष एकजूट झाल्यास भाजपला ही निवडणूक जड जाऊ शकते.

या बैठकीत १८ जुलैला होऊ घातलेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून संयुक्त उमेदवार देण्याविषयी चर्चा करण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी या बैठकीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना निमंत्रित केलेले नाही. देशात लोकशाही पूर्णपणे संपुष्टात येत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. अशा स्थितीत लोकशाहीला पुन्हा वाचविण्यासाठी संपूर्ण विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन ममता यांनी या पत्रात केले आहे.

दरम्यान, ‘संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (यूपीए) राष्ट्रपतीपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झालं तर आमचं त्यांना समर्थनच राहील. महाराष्ट्रातील व्यक्ती जर देशाचे राष्ट्रपती होत असतील, त्यासाठी त्यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर असेल,’ असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांना ‘राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. सोनिया गांधींनी अनेकांशी चर्चा केली आहे. शरद पवार हे महाविकास आघाडी तथा संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी पटोले यांनी वरील उत्तर दिले.