उत्तर प्रदेशात दुर्गापूजा मंडपाला भीषण आग; चौघांचा मृत्यू, 64 जखमी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उत्तर प्रदेशात दुर्गापूजा मंडपाला भीषण आग; चौघांचा मृत्यू, 64 जखमी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या भदोहीनजीक नर्थुआ येथील एकता दुर्गा पूजा मंडपात रविवारी रात्री 8च्या सुमारास आरती सुरू असताना भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन बालकांसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला तर, 64हून अधिक जखमी झाले आहेत.

औरई-भदोही मार्गावरील नर्थुआ येथे असलेल्या एकता क्लबचा मंडप लोकप्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात येथे गर्दी होत असते. रविवारी रात्री आठच्या सुमारास मंडपात आरती सुरू होती आणि त्यात दीडशेहून अधिक भाविक सहभागी झाले होते. याच दरम्यान मंडपाला अचानक आग लागली आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. आगीपासून जीव वाचविण्यासाठी भाविकांची पळापळ सुरू झाली. काही वेळातच संपूर्ण मंडपाने पेट घेतला. जीव वाचविण्यासाठी प्रत्येक जण जो मार्ग सापडेल तिथून पळत होता.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत अंकुश सोनी (12) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला असून 64हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून दर्घटनेची माहिती घेतली आणि जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करण्यास सांगितले. घटनेचे कारण आणि निष्काळजीपणाच्या आरोपांची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.