गोवा पर्यटन झाले असुरक्षित, दिल्लीतील कुटुंबावर प्राणघातक हल्ला

ज्या प्रकारे माझ्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला झाला त्या ठिकाणी मी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. अशी पोस्ट लिहत गोव्यातील वागणुकीची माहिती दिली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

गोवा पर्यटन झाले असुरक्षित, दिल्लीतील कुटुंबावर प्राणघातक हल्ला

या पूर्वीही पर्यटकांवर झाले आहेत असे प्रकार

कोल्हापुरातील तरुणांना आला होता असा अनुभव

नवी दिल्ली - गोव्यातील प्रसिद्ध अंजुना बीच परिसरात दिल्लीतून आलेल्या पर्यटकांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. ज्याची संपूर्ण माहिती जतिन शर्मा नावाच्या तरुणाने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. पीडित पर्यटकांशी झालेल्या चर्चेच्या आधारे इंडियन एक्सप्रेसने या घटनेबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जतिन शर्मा म्हणाले, आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून या ट्रिपचे नियोजन करत होतो. गोव्यात माझी ही पहिलीच वेळ होती आणि ज्या प्रकारे माझ्यावर चाकू आणि बेल्टने हल्ला झाला त्या ठिकाणी मी पुन्हा कधीही जाऊ शकणार नाही. अशी पोस्ट लिहत गोव्यातील वागणुकीची माहिती दिली आहे.

तो पुढे म्हणाला की, मी, आई आणि बहिणीसह सात जणांचे कुटुंब गोव्यात गेलो होतो. 5मार्च रोजी एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथे आम्ही स्विमींगपूलमध्ये पोहत असताना एकाने अश्लील टिप्पणी केली. आम्ही हॉटेलच्या कर्मचार्‍यांकडे हा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी आम्हाला तशीच वागणूक दिली. यामुळे आम्ही आमचे बुकींग थांबवले. याचबरोबर आम्ही याप्रकरणी तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी त्याने आम्हाला द्यायला सुरुवात केली. जतीन आणि त्याचे कुटुंब ग्रेटर नोएडा येथे राहतात आणि सलून चालवतात.

काही तासांनंतर, संध्याकाळी 6 च्या सुमारास, जतीन शर्मा आणि त्यांचे कुटुंब रिसॉर्टच्या बाहेर असताना, निलंबित कर्मचारी रॉयस्टन डायस उर्फ ​​रोशनसह इतर किमान 3 जणांनी त्यांच्याशी वाद घातला. यामध्ये त्यांच्यात वाद झाला यातून तिघांनी मिळून जतीन याला मारहाण केली. जतीन म्हणाला, त्यांच्याकडे चाकू, बेसबॉल बॅट आणि बेल्ट होते त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे माझ्या छातीच्या डाव्या बाजूला दुखापत झाली. माझे काका आणि 59 वर्षीय वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. माझ्या काकांच्या उजव्या हाताच्या तळव्यावर जोरदार वार केल्याने मोठा घाव बसला आहे. माझ्या वडिलांच्या उजव्या हाताला अनेक जखमा झाल्या आहेत. अशीही तक्रार त्यांनी दिली आहे.

जतिन शर्मा यांचे काका आणि तक्रारदार अश्वनी कुमार (47) यांनी सांगितले की, आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे हा हल्ला झाला. दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील कुमार म्हणाले, माझी पत्नी आणि भाची मदतीसाठी ओरडत राहिले, पण ते थांबले नाहीत. तिघांनाही स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून अश्विनी कुमार यांना डिस्चार्ज देण्यात आला.

तर जतिन शर्मा आणि त्यांचे वडील अनिल यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. बांबोलीम येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 6 मार्च रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, कुटुंब दुसर्या रिसॉर्टमध्ये थांबले आणि 9 मार्च रोजी दिल्लीला परतले. परंतु त्यांच्यावर गोव्यात असा भयानक प्रकार घडल्याने त्यांनी गोव्यातील पर्यटनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी प्रबोधन न्यूजने ३१ मे रोजी कोल्हापुरातील तरुणांची झालेल्या फसवणुकीची बातमी दिली होती.

काय आहे बातमी ?

गोवा हे असे राज्य आहे की, पर्यटनासाठी देशभर ओळखले जाते. येथील समुद्र व बीच सगळ्यांना खुणावत आपल्याकडे बोलावत असतो. दरवर्षी लाखो पर्यटक गोव्याला भेट देण्यात येत असतात. गोव्याची अर्थव्यवस्था याच पर्यटकांवर अवलंबून आहे. पण याच गोव्यात असे काही घडले आहे की अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गोव्याला फिरायला जाण्याचा कोणाचा विचार असेल तर तो आता हजार वेळा विचार करेल. या घटनेमुळे गोव्याच्या आजवरच्या प्रतिमेला कलंक लागला आहे. नेमके काय घडले आहे ते पुढील बातमी वाचल्यावर समजलेच शिवाय या बातमीसोबत एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे तोही नीट पाहा.

महाराष्ट्रातील काही तरुण मुले जी 17-18 वर्षांची आहेत ती गोवा येथे फिरायला गेले होते. परत येताना त्यांच्यावर म्हापशा येथे त्यांच्यावर जो काही प्रसंग गुजारला ते पाहून प्रत्येकाच्या मस्तकाची शीर ठणकल्याशिवाय राहणार नाही. या तरुणांना स्वस्तात जेवण देतो असे सांगून एका खोलीत बंदिस्त करून ठेवले, त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. अंगावरील दागिने तर काढून घेतलेच शिवाय घरच्यांना फोन करायला लावून पेटीएमद्वारे पैसे मागविले. त्यांच्या गुप्तांगावर प्रहार करण्यात आले. एवढ्यावरच थांबले नाही तर काही मुलींना बोलावून घेतले व त्यांच्याशी लगट करायला लावले, त्याचा व्हिडिओ काढून या मुलांना धमकी देण्यात आली की, जर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकू.

जेव्हा त्या लुटारूंना कळले की ही मुले महाराष्ट्रातील आहेत तेव्हा त्यांनी शिवाजी छत्रपतींच्या नावाने अर्वाच्च शिवीगाळ केली. पण ही मुले काहीच करू शकत नव्हते कारण ते लुटारू शस्त्रसज्ज होतेच शिवाय त्यांची संख्याही दुप्पट होती. अनन्वीत छळ केल्यानंतर या मुलांना सोडून देण्यात आले. मुले कशीबशी आपल्या घरी परतली पण त्यांची मनःस्थिती पूर्णपणे बिघडून गेली होती.

यातील दोन मुलांनी तर आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण यातील एक मुलगा एका संतोष या पत्रकाराकडे गेला व आपल्यावर गोव्यात झालेली आपबिती सांगितली. ते ऐकून संतोषलाही शॉक बसला आणि त्याने या मुलांना धीर दिला व गोव्यात पुन्हा जाऊन तक्रार देऊ असे सांगितले. पण मुलांना एवढा मानसिक धक्का बसला होता की पुन्हा गोव्यात जाण्यास राजी होत नव्हते. मग या पत्रकाराने महाराष्ट्रातील पोलीस बरोबर घेऊन गोव्यात गेले व रीतसर तक्रार दिली.

या पत्रकाराने गोव्याचे मुख्यमंत्री सावंत व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व गोव्याचे निवडणुकीतील प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकाराची दखल घेण्यास सांगितले आहे. संतोषने ही सर्व घटना एका व्हिडिओमध्ये कथन करून तो व्हिडिओ व्हायरल केला आहे, जेणेकरून पर्यटकांनी याचा विचार करावा व या मुलांना न्याय मिळावा. या पूर्वी अशा किती घटना घडल्या, किती जणांना लुटले हे पोलीस तपासात कळेलच. जो पर्यंत या प्रकरणाचा छडा लागून आरोपींना शिक्षा होत नाही तो पर्यंत गोव्याला न गेलेलेच बरे, नाही का ?