मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा
मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा

पुणे, दि. 5 मार्च, - रविवारी (दि. 6) पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. या उद्घाटनावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा झाल्याचे पाहायला मिळत आहे. मोदींच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निशाणा साधला आहे. तर भाजपचे गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदी उद्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. त्यातील एक मार्ग आहे वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा आहे. हा मार्ग 13 किलोमीटरचा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झाला आहे, त्याचे उद्या मोदी उद्घाटन करणार आहेत. तर दुसरा मार्ग आहे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटचा आहे. हा मार्ग 12 किलोमीटरचा असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. मोदी उद्या पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचेही उद्घाटन करणार आहेत. 

याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनासाठी येत आहेत. पण ते अर्धवट कामाचे उद्घाटन करत आहेत. अजूनही मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. याचा विचार पंतप्रधानांनी केला असावा'. मेट्रो प्रकल्प पूर्ण व्हायला अनेक वर्षे लागणार आहेत. त्याचे आपण उद्घाटन करत आहोत. नदी सुधार प्रकल्पाचेही उद्घाटन होत आहे. ही कामे महत्त्वाची आहेत, पण आता भारतीय विद्यार्थ्यांना सोडवून आणण्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. पुणे महापालिकेच्या अर्धवट कामांच्या उद्घाटनापेक्षा ते अधिक महत्त्वाचे आहे, असा खोचक टोला पवार यांनी लगावला आहे.

दुसरीकडे भाजपवाल्यांच्या जिव्हारी शरद पवारांची टीका लागलेली पाहायला मिळत आहे.  'पवारांच्या आरोपांना काही अर्थ नाही. जी कामं पूर्ण झाली आहेत त्याचीच उद्घाटनं होतायत. पवार साहेबांचा मेट्रोशी काडीमात्र संबंध नसताना ते मेट्रोमध्ये फिरून का आले? मी किती चांगलं काम करतोय हे दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोप महाजन यांनी केला. 'पंतप्रधान येतायत त्यामुळं सगळं पुणं भाजपमय, मोदीमय झालंय. त्यामुळं त्यांना वाईट वाटलंय. त्यातूनच पवार साहेब असले आरोप करत आहेत, अशी टीका भाजप नेते गिऱीश महाजन यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, 'युक्रेनमधील विद्यार्थ्यांकडं केंद्र सरकारनं अजिबात दुर्लक्ष केलेलं नाही. विद्यार्थ्यांना आणलं जात आहे. दररोज दोन-दोन, तीन-तीन फ्लाइट भारतात येत आहेत. आमचे चार कॅबिनेट मंत्री युद्ध भूमीच्या अगदी जवळ गेलेत. असं पहिल्यांदाच होतंय. मंत्री स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना भेटतायत, त्यांना दिलासा देतायत, विचारपूस करतायत. त्यांना मायदेशात आणण्याचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना केंद्र सरकार काहीच करत नाही असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पवार साहेब करत आहेत,' असंही महाजन म्हणाले