मटका किंग खून प्रकरणी भाजपचा कार्यकर्त्याला अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 23 - पुण्यातील मटका किंग संजय पाटोळे याच्या खून प्रकरणी पुण्यातील भाजप कार्यकर्ता अमोल हुलावळे (वय 36, रा. कात्रज) यास सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अमोल यास गोल्डन मॅन म्हणूनही ओळखले जाते.
अमोल हा भाजपच्या माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचा पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आहे. अमोल येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे नगरसेवकाची निवडणूक लढवण्याची तयारी करीत होता. यासाठी त्याने भारती विद्यापीठ परिसरात अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले होते.
संजय पाटोळे याचा खून पैशांच्या देवाण-घेवाणीतून झाला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या मृत्युप्रकरणी तरबेज सुतार, किरण साळुंखे, विकी जाधव, शंकर पारवे, नितीश ऊर्फ सतीश पतंगे, राकेश गायकवाड अशा सहा जणांना या पूर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अमोलचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली आहे.