पुण्याची आता ड्रग्जचे माहेरघर अशी ओळख

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्याची आता ड्रग्जचे माहेरघर अशी ओळख

पुणे , (प्रबोधन न्यूज )   -  अमली पदार्थ प्रकरणी जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. पुणे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शहर आहे. मूळ पुण्याची जगभर असलेली ओळख पुसून जाऊन शहराची आता ड्रग्ज व पब्जचे माहेरघर अशी ओळख होत आहे, भाजप शिंदे गटाच्या सरकारमुळे पुणे शहर बदनाम होत आहे , असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याचा दावा करणारी चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर रविवारी खळबळ उडाली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठला असून देशभर गाजलेल्या ललित पाटील प्रकरणानंतर काल पुण्यात काही अल्पवयीन मुलांचे हॉटेल मध्ये ड्रग्ज सेवन करतानाचे व्हिडियो व्हायरल झाल्यावर पुणे पोलिसांना जाग येऊन पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. थोडक्यात काय तर पोलिसांना गुन्ह्यांची माहिती आता त्यांच्या खब-यांकडून मिळत नसून ती सोशल मीडियावर मिळत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे पाटील म्हणाले आहे की, अगरवाल पॉर्शे कार अपघात प्रकरणात तर थेट मुलाच्या रक्ताच्या जागी मुलाच्या आईचे रक्त बदलून ठेवण्यात आले. पैशांच्या जोरावर व्यवस्थेला कशाप्रकारे वाकवले जाते, याचे समोर आलेले हे एकमेव उदाहरण आहे. लोकांच्या नजरेसमोर कधीही आले नाहीत, असे हजारो प्रकार असावेत. ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून यामागे सध्याच्या सत्ताधा-यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे , अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.