... चूक असेल तर फाशी देण्याची सुप्रिया सुळेंनी केली मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

... चूक असेल तर फाशी देण्याची सुप्रिया सुळेंनी केली मागणी

नवी दिल्ली, दि. 26 मार्च – सीबीआय, ईडी, आयकर या स्वायत्त संस्था आहेत, सरकारचा त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही असं भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमीच सांगत असतात. मात्र लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुराव्यानिशी या दाव्याची पोलखोल केल्याचे पाहायला मिळाले.

सभागृहात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. तसेच या संस्था स्वतंत्र असल्याचा दावा करतात मग कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधी ट्विटरवर कसं समजतं, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते, असंही सुप्रिया सुळेंनी नमूद केलं. त्या लोकसभेत केंद्रीय तपास संस्थांच्या कारभारावर बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसं समजतं? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?

हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. आता जेव्हा तुमचे कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची माहिती जाहीर करतात तेव्हा तुम्हाला कोणी विचारणार नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे.

आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा, असं संतप्त मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.