एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर – अनिल परब
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - केंद्र सरकारने दुस-या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याने एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे.
अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असे परब यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा आजच पुरवठा होणार
आजपासूनच ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तात्काळ मदतीसाठी राज्य सरकारने मदत सुरू केली आहे, असे ते म्हणाले.